Type to search

नंदुरबार

भामरामाळ येथे 4 लाखांचे लाकूड जप्त

Share

नंदुरबार । नंदुरबार वनविभागाचे सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांना नवापूर वनक्षेत्रातील मौजे वडकळंबी व भामरमाळ येथील शेगा रेशमा गावीत रा वडकळंबी व यशंवत गोमा गावीत रा भामरमाळ या दोघांच्या घरात अवैध व चोरीचे सागवानी तसेच सिसमचा लाकूड साठा असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सांफळा रचून घराची झडती घेतली   असता,  दोन्ही ठिकाणी रंधा मशिन व ताजा तोडीचा साग, सिसम व आड जात चोपट तसेच भामरमाळ येथील झडतीत तयार दरवाजा शटर 3 व बॉक्स  पलांग आदी लाकुड मुद्देमाल यंत्रसामुग्रीसह आढळून आला.

हा मुद्देमाल जप्त करुन खाजगी व शासकीय वाहनाने नवापूर येथील शासकीय वन आगारात जमा करण्यात आला. सदर जप्त मुद्देमालाची किंमत अंदाजे 4 लाख इतकी आहे. सदर कार्यवाही सहायक वनसंरक्षक नंदुरबार वनक्षपाल प्रथमेश हडपे, वनपाल प्रकाश मावची,डी के जाधव,वनरक्षक कमलेश वसावे,नितिन पाटील,दिपक पाटील,सतिष पदमोर,संजय बडगुजर,संतोष गायकवाड,रामदास पावरा,अशोक पावरा,लक्ष्मण पवार,श्रीमती दिपाली पाटील,संगिता खैरणार,आरती नगराळे,तसेच वनमजुर व नंदुरबार, चिंचपाडा वनक्षेत्रातील कर्मचारी वृंद,वाहन चालक भगवान साळवे, एस.एस तुंगार,आबा न्याहळदे,माजी सैनिक विशाल शिरसाठ,रविंद्र कासे यांनी केली.

सदर कार्यवाही उपवन संरक्षक नंदुरबार वनविभाग शहादा व विभागीय वनअधिकारी दक्षता पथक धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. याबाबत  नवापूर वनक्षेत्रपाल यांनी दिलेल्या फिर्यादनुसार आरोपी विरुध्द  वन गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या कार्यवाहीमुळे नवापूर तालुक्यात अवैधरित्या लाकुड व्यवसाय करनार्‍यांचे  धाबे दणाणले आहे.  यापुढे अशीच मोहीम सुरु राहणार असल्याची माहिती गणेश रणदिवे व प्रथमेश हाडपे यांनी दिली आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!