Type to search

नंदुरबार

युतीच्या सत्तेसाठी शिवसैनिक चढला टॉवरवर

Share

नंदुरबार । राज्यात भाजपा-सेना युतीचे सरकार स्थापन व्हावे या मागणीसाठी तालुक्यातील कार्ली येथील शिवसैनिकाने चक्क शहरातील गांधीनगर येथील मोबाईल टॉवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले. जोपर्यंत उद्धव ठाकरे यांचा फोन येत नाही, तोपर्यंत टॉवरवरुन खाली उतरणार नाही, असा पवित्रा त्याने घेतल्याने पोलीसांची एकच धावपळ उडाली होती. मात्र, सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास त्याची समजूत काढण्यात पोलीसांना यश आले.

नंदुरबार तालुक्यातील कार्ली येथील तुकाराम भिका पाटील या शिवसैनिकाने राज्यात भाजपा-सेना युतीचे सरकार स्थापन व्हावे या मागणीसाठी मोबाईल

टॉवरवर चढून शोले स्टाईलने अनोखे आंदोलन केले. आज दुपारी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास तुकाराम भिका पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, आघाडी शासनाने फार घोटाळे केले आहेत. राज्याने युतीला भरभरून प्रेम दिले आहे.व त्यांनाच जनादेश दिला आहे.

त्यामुळे जनादेशाचा अपमान न करता भाजपा-सेना युतीचे सरकार स्थापन करावे अशी मागणी केली. तसेच जोपर्यंत शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचा फोन येत नाही तोपर्यंत टॉवरवरुन खाली उतरणार नाही, असा पवित्रा त्याने घेतला. दरम्यान, त्याला खाली उतरवण्यासाठी पोलीसांनी खूप प्रयत्न केले. मात्र, तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. तब्बल पाच तास हा आंदोलनकर्ता टॉवरवरच होता. सायंकाळी 5.30 च्या सुमारास त्याची समजूत काढण्यात पोलीसांना यश आले. त्यानंतर त्याला खाली उतरवण्यात आले. त्यानंतर त्याच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला असून अटकही करण्यात आली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!