Type to search

नंदुरबार राजकीय

अक्कलकुवा ग्रुप ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत 57.88 टक्के मतदान, आज निकाल

Share

अक्कलकुवा । अक्कलकुवा ग्रुप ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत आज झालेल्या मतदानात 57.88 टक्के मतदान झाले असुन तिरंगी लढतीत कोण विजयी होईल याकडे जिल्ह्याचे लक्ष लागुन आहे.उद्या दि.24 रोजी मतमोजणी होणार आहे.

अक्कलकुवा तालुक्याच्या ठिकाणी असलेली ग्रुप ग्राम पंचायत निवडणुकीसाठी ग्रुप ग्रामपंचायत अक्कलकुवाची लोकनियुक्त सरपंच पद हे अनुसूचित जमाती महिला राखीव जागेसाठी आरक्षित होते.पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्ष व शिवसेना यांची युती होती.तर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी देखिल आघाडी केली आहे, तसेच या चौघा पक्षांना शह देण्यासाठी एम. आय. एम. पक्षाच्या उमेदवार रिंगणात उतरविण्यात आले आहेत.तालुक्यातील मोठी ग्रुप ग्रामपंचायतीच्या नावाने अक्कलकुवाची ओळख झाली आहे, भारतीय जनता पक्ष व शिवसेना यांची युतीचे पुरष्कृत उमेदवार म्हणून तत्कालीन सरपंच उषाबाई प्रवीण बोरा यांची कपबशी चिन्हावर उमेदवारी केली आहे,

तर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस चे पुरस्कृत उमेदवार म्हणून माजी ग्रामपंचायत सदस्य सुशिलाबाई गेमु वळवी यांनी टोपली चिन्हावर उमेदवारी केली आहे, व एम. आय. एम. पक्षाच्या पुरष्कृत उमेदवार म्हणून राजेश्वरी इंद्रवदन वळवी यांना उमेदवारी करिता शिट्टी चिन्हावर उमेदवारी केली आहे. आज रोजी मतदान झाले.शहरातील दहा केंद्रावरून गर्दि दिसून आली नाही, मतदारांचा थंड प्रतिसाद पाहायला मिळाला.लोकनियुक्त सरपंच पदाची निवडणूक ही आगामी होणार्‍या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक व होणार्‍या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आव्हानात्मक निवडणूक होणार आहे, याकरिता सर्वच पक्षाचे नेते जोमाने कामाला लागले होते.अक्लकुवा येथे 10हजार 151 मतदारांपैकी 5 हजार 875 उमेदवारांनी मतदानावा हक्क बजावला एकुन 57.88 टक्के ईतके मतददान झाले.उद्या दि.24 रोजी मतमोजनी होणार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!