Type to search

नंदुरबार

आकांक्षित कार्यक्रमांतर्गत शाळा डिजिटल होणार!

Share

नंदुरबार । आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांंतर्गत आज जिल्हा प्रशासन आणि एचपीसीएल यांच्यात  सामज्यंस करार करण्यात आला. या कराराच्या माध्यमातून आदिवासी आश्रमशाळा डिजिटल करण्याबरोबरच जवाहर नवोदय विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

एचपीसीएल नंदुरबार जिल्ह्याच्या विकासासाठी 2 कोटी 27 लाख 71 हजार सीएसआर अंतर्गत सहाय्य करणार आहेत.  ज्यामध्ये आदिवासी विभागाच्या सर्व 131 शाळांमध्ये डिजीटल क्लासरुम तयार करण्यात येणार आहेत. या क्लासरूममध्ये इन्ट्रॅक्टीव्ह बोर्ड आणि प्रोजेक्टर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यात अक्कलकुवा 28, धडगाव 27, तळोदा 11, शहादा 18, नवापूर 27 आणि नंदुरबारमधील 20 शाळांचा समावेश आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षण घेता येईल. अक्कलकुवा येथील जवाहर नवोदय विद्यालयासाठी  18 लाख 11 हजार रुपयांचे 6 सोलर वॉटर हिटर सिस्टिम, 1 हॉयस्पीड प्रिंन्टर, इन्ट्रॅक्टीव्ह बोर्ड व प्रोजेक्टर 4, फोटो कॉपी मशिन 1,आणि 5 संगणक देण्यात येणार आहेत.

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड हे स्वतः नवोदय विद्यालयाचेच माजी विद्यार्थी असून त्यांनी या कारणासाठी विशेष प्रयत्न केले. जिल्ह्यात आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना चांगल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देत त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला पोषक वातावरण निर्माण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असून हा करार त्याचाच एक भाग असल्याचे डॉ.भारुड यांनी सांगितले. त्यांनी एचपीसीएलला धन्यवाद दिले.

यावेळी एचपीसीएलचे मुख्य क्षेत्रीय प्रबंधक प्रयल जांभुळकर, पिरामल फाऊंडेशनचे प्रोग्राम मॅनेजन किशोर घरत, एरिया मॅनेजर अमित राणे, चिफ मिनिस्टर फेलो शुभम सोनार उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!