Type to search

नंदुरबार

जिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी तसेच गुलाबपुष्प देवून नवागतांचे स्वागत

Share

नंदुरबार । शाळेच्या पहिल्या दिवसानिमित्त जिल्ह्यात विवीध शाळांमध्ये कार्यक्रमांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करत कार्यक्रम साजरा करण्यात आले.

एकलव्य विद्यालय नंदुरबार
एकलव्य विद्यालयात शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय होती. प्रातिनिधीक स्वरूपात गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक वितरित करण्यात आले. अध्यापनाचे कार्य पहिल्याच दिवशी सुरु झाले. कार्यक्रमास विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ सुहासिनी नटावदकर, उपमुख्याध्यापक एच एच ख़ैरनार, ए एन पाटील, ए जी लांडगे उपस्थित होते.

नवजीवन विद्यालय वाघाळे
नंदुरबार तालुक्यातील वाघाळे येथील नवजीवन विद्यालय येथे शाळेचे प्रवेशोत्सव व पुस्तक वाटप झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य पुष्पेंद्र रघुवंशी होते व नवीन विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप करण्यात आले. अध्यक्ष पुष्पेंद्र रघुवंशी यांनी आपल्या मार्गदर्शन नवगतांना या शैक्षणिक वर्षाच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी आभार डी.के.पाटील यांनी मानले. यशस्वीतेसाठी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी सहकार्य केले.

व्हॉलंटरी प्राथमिक, माध्यमिक विद्यालय शहादा
महिला मंडळ संचलित व्हॉलंटरी प्राथमिक, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेशोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थी व पालकांचे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रांताधिकारी लक्ष्मीकांत सातळकर, विश्वस्त हैदरअली नुरानी, पत्रकार रणजित राजपूत, अ‍ॅड.राजेश कुलकर्णी, प्रभाकर उमराव, इंदुमती पाटील, माजी मुख्याध्यापिका प्रतिभा भावसार, प्रवीणा कुलकर्णी, मुख्याध्यापिका ताराबाई बेलदार, प्राचार्य नयना पाटील आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी मंजुळे म्हणाले, माणसाकडे परिश्रम, जिद्द, चिकाटी, प्रामाणिकपणा असेल तर तो जीवनात कोणत्याही क्षेत्रात यश मिळवू शकतो. प्रत्येक विद्यार्थ्याने एखादे लक्ष डोळ्यासमोर ठेवून त्याच्याकडे वाटचाल केली तर यश निश्चित मिळते. मेहनत करून कलेक्टर बनण्याचे ध्येय बाळगले होते ते साकार देखील झाले म्हणून आपणही एखादे ध्येय ठेवून ते मिळवण्यासाठी परिश्रम करण्याचे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रतिभा बोरसे यांनी केले. आभार अर्चना पवार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुनिता पाटील, नम्रता पाटील, विजया पाटील, ललिता राठोड, रंजना पाटील, कौशल्या चौरे, मोनिका कुवर, मीना ठाकूर, वृषाली भावसार, पुष्पा चौधरी, अनिता पाटील, संगीता पोटे, निर्मला दुसाने, भावना जव्हेरी, मनीषा पाटील यांच्यासह आधी शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.

जि.प.शाळा प्रकाशा
प्रकाशा येथील जि.प.केंद्र शाळा येथे पहिल्याच दिवशी मुला मुलींची शाळेत उपस्थिती दिसून आली. दोन महिन्यानंतर शिक्षक,शिक्षिका,विद्यार्थी एकत्र आल्याने शाळेचा परिसरात चैतन्य वातावरण दिसून आले. शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवसाचे औचित्ये साधून उपस्थित मान्यवरांनी नवागत बालकांचे फुल ,चॉकलेट देऊन स्वागत केले. सरपंच सुदाम ठाकरे, उपसरपंच भरत पाटील, रफिक रशीद खाटीक, माजी उपसरपंच व पत्रकार, पालक उपस्थित होते. दरम्यान, सरस्वती माता, सावित्रीबाई फुले, जिजामाता यांच्या प्रतिमेचे पूजन करून गावातून पालखी काढण्यात आली. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शाळेचा पहिला दिवस असल्याने गोड जिलेबी मिठाई,मिष्टान्न, सह भोजन आहार देण्यात आले. शाळेचा पहिला दिवस असल्याने सर्व माता पालक शिक्षक, शिक्षिका, अधिकारी उपस्थित होते. रमेश चौधरी, गोविंद वाडीले, केंद्र प्रमुख राजेंद्र धनगर, मुख्याध्यापक रामलाल पारधी, रवींद्र पाटील, जावेदभाई, दर्पण भामरे, तसेच शिक्षिका संगीता राणे, कविता पाटील, प्रियांका पाटील, नूतन पाटील, अनुराधा गव्हाणे, शबिना बानो जल्लोधींन आदी उपस्थित होते.

प्राथमिक,माध्यमिक विद्यालय नवापूर
नवापूर शहरातील अशरफभाई मजितभाई लखानी अल्पसंख्याक विकास बहुउद्देशीय संस्था संचलीत प्राथमिक,माध्यमिक तथा उचमाध्यमिक विद्यालय येथे शाळेचा पहिला दिवसानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी यास्मीन लखानी, शबनम पठाण यांचा हस्ते 5 वी ते 8 वी पर्यंतचा विद्यार्थीना शालेय पाठ्य पुस्तकांचे वाटप करण्यात आले.तसेच उपस्थित मान्यवरांचा हस्ते शाळेचा आवारात वृक्षारोपण करण्यात आले.शाळेचा पहिला दिवस असल्यामुळे विद्यार्थीचे 4 वेगवेगळ्या मिका माऊस यांचा माध्यमातुन नवगतांचे पुष्पगुच्छ देऊन व ढोल तासे वाजवुन स्वागत करण्यात आले तसेच विद्यार्थी सोबत पालकांचे शाळेतर्फे उपस्थित मान्यवरांचा हस्ते स्वागत करण्यात आले. यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक हरीष बोरसे, मुख्याध्यापीका भाग्यश्री गारुडे,शिक्षक सुरेश पाटील,जुबेर पठाण,कल्पेश पाटील,अनंत हिरे,धर्मेश तांबोळी,सुम्मयाँ पठाण,इमरान शेख यांनी परीश्रम घेतले,या कार्यक्रमाचे सुञसंचलन श्रीमती धर्मीष्ठा पाटील यांनी केले तर आभार शिक्षक राकेश सोनवणे यांनी मानले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!