Type to search

नंदुरबार

शिवसेनेतर्फे शेतकरी पिक विमा मदत केंद्राचे उद्घाटन

Share

अक्कलकुवा । अक्कलकुवा येथे शिवसेना जिल्हा कार्यालयात शिवसेना जिल्हा प्रमुख आमश्या पाडवी यांच्या हस्ते शेतकरी पिक विमा मदत केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी नंदुरबार जिल्हा प्रमुख आमश्या पाडवी यांनी सांगितले की शिवसेना भवन येथे शुक्रवारी झालेल्या सर्व जिल्हाप्रमुखांच्या बैठकीत पीकविमा योजनेच्या लाभापासून वंचित असलेल्यांसाठी शिवसेनेच्या वर्धापन दिनापासून 34 जिल्ह्यांत तालुका स्तरावर प्रत्येकी एक पीकविमा योजना मदत केंद्र उभारण्याचा निर्णय शिवसेनेने घेण्यात आला आहे.राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळ जाहीर झाला आहे. तरी अनेक शेतकरी पीकविमा लाभापासून वंचित आहेत. खात्याचा क्रमांक चुकला म्हणून 10 हजार शेतकर्‍यांना विम्यापासून वंचित राहावे लागले आहे, असं शिवसेनेने स्पष्ट केलं आहे. सरकार आणि केंद्र यांच्यात ताळमेळ नसल्याचा फटका शेतकर्‍यांना बसत आहे. इफ्को टोकियाही खाजगी कंपनी पीकविमा पुरवित आहे.

याविरोधात शेतकरी रोज तक्रार करत आहेत, असंही त्यांनी सांगितले,शेतकर्‍यांना पिक विमा व्यवस्थित मिळावा म्हणून सदर मदत केंद्र शिवसेनेच्या वर्धापन दिनापासून सुरू करत आहोत तरी तालुक्यातील शेतकर्‍यांनी याचा फायदा घ्यावा असे आवाहन केले. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख जयप्रकाश परदेशी, तालुका उपप्रमुख तापसिंग वसावे, जिल्हा संघटक लक्ष्मण वाडिले, सोरापाडा सरपंच छोटुलाल पाडवी, कुवरसिंग पाडवी, नवरतन टाक, रोहित चौ़धरी, गोलु चंदेल, तुकाराम वळवी तसेच शिवसेनेचे कार्यकर्ते व नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!