Type to search

नंदुरबार

जिल्ह्यात शेती विकासासंबंधी योजनांबद्दल शेतकर्‍यांमध्ये जनजागृती करावी!

Share

नंदुरबार । आकांक्षीत जिल्ह्यातील शेतकर्‍यांचा पिक उत्पादन खर्च कमी करून त्यांचे उत्पन्न कसे वाढवता येईल. त्याबद्दल तांत्रिक पिक नियोजन प्रशिक्षण गावपातळीवरील तळागाळातील शेतकर्‍यांपर्यंत पोहचवावे,शेती विकासासंबंधीत शेतकर्‍यांपर्यंत पोहचवुन शेती विकासासंबंधी योजनांबद्दल जनजागृती करावी असे प्रतिपादन जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी आकांक्षीत जिल्ह्याकरीता कृषी विकास कार्यक्रम अंतर्गत मास्टर ट्रेनसासाठी एक दिवशीय प्रशिक्षणात केले.

निती आयोग अंतर्गत आयटीसी मिशन सुनहरा कल यांच्यातर्फे कृषी विज्ञान केंद्र कोळदा ता.नंदुरबार येथे जिल्ह्यातील कृषी विभागाचे मंडळ कृषी अधिकारी यांचे मास्टर ट्रेनरसाठी एक दिवशीय प्रशिक्षण व कार्यशाळा आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरूवात बलराम यांच्या प्रतिमा पुजन व दिपप्रज्वलन जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी कृषी उपसंचालक दिपक पटेल, आयटीसी राज्याचे कार्यक्रम अधिकारी सुरेश पौल, कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषतज्ञ आर.एम.पाटील, यु.डी.पाटील, दिलासा संस्थाचे प्रकल्प समन्वयक आशीष किगरणापुरे आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. मंजुळे म्हणाले की, आकांक्षीत जिल्ह्याकरीता कृषी विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकर्‍यांचे उत्पादन व उत्पन्न वाढवण्यासाठी गावपातळीवर कृषी सहायक, मंडळ कृषी अधिकारी यांनी फ्लीप चार्ट मोडयुमच्या माध्यमातून तांत्रिक शेतीचे प्रशिक्षण शेतकर्‍यांना द्यावे, असे सांगितले. आयटीसीचे सुरेश पौल यांनीही आपल्या प्रास्ताविकामध्ये जिल्ह्याचा डेल्टा रँकीग व वाढवण्याकरीता कृषी विकास कार्यक्रमाच्या अनुषंगाने व शेतकरी प्रशिक्षण व विविध योजना जनजागृती करून याबद्दल मार्गदर्शन केले.

कार्यक्रमास कृषीतज्ञ राहुल पाटील, नंदुरबार मंडळ कृषी अधिकारी पी.जे. चव्हाण, शहादा मंडळ कृषी अधिकारी एस.एन.गावीत, धडगांव मंडळ कृशी अधिकारी पी.बी. पाडवी, खांडबारा मंडळ कृषी अधिकारी पी.एच.धनगार, सोमावल मंडळ कृषी अधिकारी व्ही.मोहिने, मोलगी मंडळ कृषी अधिकारी ए.जे. खैरनार, अक्कलकुवा मंडळ कृषी अधिकारी एस.एस.राजपूत, म्हसावद मंडळ कृषी अधिकारी के.ए.जाधव, नंदुरबार मंडळ कृषी अधिकार आय.यु.पाटील, अक्राणी मंडळ कृषी अधिकारी आर.एम.शिंदे, मंदाणा मंडळ कृषी अधिकारी एस.बी.बागुल, विसरवाडी मंडळ कृषी अधिकारी एस.जे. राऊत, कळंबू मंडळ कृषी यु.जे.चव्हाण, तळोदा कृषी पर्यवेक्षक एस.एच.साळवे, नवापूर कृषी पर्यवेक्षक टि.के.वळवी, अक्कलकुवा कृषी सहायक पी.एल. जाधव आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन श्री. कुंदे यांनी केले.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!