Type to search

Breaking News नंदुरबार मुख्य बातम्या

तोरखेडा येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत तीन घरे जळून खाक

Share

शहादा ।  ता.प्र.- शहादा तालुक्यातील तोरखेडा येथे पहाटे तीन वाजेच्या सुमारास शॉकसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत तीन घरे जळून खाक झाली आहेत.या अग्नितांडवात तिघा मोरे बंधूंची घरे भस्मसात झाली असून घरांचा केवळ सांगाडा शिल्लक राहिला आहे.आगीत सुमारे 50 लाखाच्यावर नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे .आग आटोक्यात आणण्यासाठी शहादा व शिरपूर येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते.

तोरखेडा (ता. शहादा) येथे तिलोनी चौक वसाहतीत आज पहाटे 2.30 ते 3 वाजेच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत दगा सुकन मोरे, झगा सुकन मोरे व हिरालाल सुकन मोरे या तिघा भावांची घरे भस्मसात झाली आहेत प्रचंड उकाड्यामुळे तिघे भाऊ परिवारासह बाहेर झोपलेले होते.

तसेच वसाहतीत देखील सर्वच परिवार बाहेर गाढ झोपेत होते.त्याचवेळी अर्जुन मोरे हे लघुशंकेसाठी उठले असता त्यांना दगा मोरे यांच्या घरातून धुराचे लोण येताना दिसले.त्यांनी तात्काळ आरडाओरड करून सर्वांना उठविले त्यांनी घराचा दरवाजा उघडून पाहिला असता तिघा भावांची घरे धुराने व्यापली होती.काही वेळातच ही घरे आगीच्या वेढ्यात सापडली. आग आटोक्यात आणण्यासाठी शहादा व शिरपूर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले मात्र अग्निशमन बंब पोहचण्यापूर्वीच आगीने रुद्ररूप धारण केले होत. ही घरे संपूर्ण लाकडाची असल्यामुळे जळून खाक झाली आहेत. या आगीत तिघा भावांचे अन्न-धान्य सहित संसारोपयोगी साहित्य टीव्ही, फ्रिज,कपडे आदी चीज वस्तू जळून खाक झाले आहेत.घरांचा केवळ सांगाडा उरला असून शेतमजुर असलेल्या या तिघा परिवारावर मोठी आपत्ती कोसळली आहे. आगीत सुमारे 50 लाखाच्यावर नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.घटनास्थळी सरंगखेड्याचे सहा. पोलिस निरीक्षक न्हायदे यांनी भेट दिली तर महसूल विभागाच्यावतीने पंचनामे करण्यात आले आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!