Type to search

नंदुरबार

जुन्या पेन्शनसाठी सोमवारी आझाद मैदानावर आमरण उपोषण

Share

नंदुरबार । जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी सोमवारी मुंबईत आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार असून, येथील जुनी पेन्शनर संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर घोषणाबाजी करीत निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार यांना निवेदन सादर केलेयाबाबत निवेदनात म्हटले आहे की, विविध शैक्षणिक संस्थांमध्ये 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नेमणुका झालेल्या असून,त्यानंतर टप्प्याटप्प्याने 100 टक्के किंवा 100 टक्के अनुदानावर कर्मचारी कार्यरत आहेत.

शासनाने 2005 नंतर सेवेत असलेल्या सर्व कर्मचार्‍यांसाठी नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना लागू केली.सर्वांच्या नेमणुका 2005 पूर्वीच्या असून केवळ शासनाच्या टप्पा किंवा 100 टक्के अनुदान योजनेच्या निर्णयामुळे कर्मचार्यांना 100 टक्के अनुदान मिळालेले आहे.तथापि कर्मचार्‍यांच्या नेमणुका ह्या 2005 पूर्वीच्या असल्याने जुनी पेन्शन योजना मिळालीच पाहिजे या प्रमुख मागणीसाठी जुनी पेंशनर संघर्ष समितीच्या वतीने मंगळवार दि. 18 जून मंगळवार रोजी दुपारी मुंबई येथील आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसणार असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

निवेदनावर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष प्रभाकर नांद्रे,इंद्रसिंग गिरासे, प्रकाश आव्हाड, शांताराम पाटील, दिनेश पाटील,राजेंद्र पाटील, सुरेश पाटील,सुदाम पाटील,अशोक निकम, सुरेश सोनवणे ,भटू सोनवणे, किरण कुवर, शेख मोहम्मद, विकास बागुल,साळुंखे संदीप, शंकर पाटील,गजानन काटे,संजीव पाटील, अशोक पाटील,जयदेव सिंह राजपूत, संजय बागुल,प्रदीप बागुल, किशोर बागुल, विठोबा राजपूत,विजय देवरे, तुकाराम पाटील,जितेंद्र गिरासे,संजय सैंदाणे, किशोर बागुल,अनिल पाटील आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!