Type to search

नंदुरबार

नाचण्याचा दांगडो भोवला : सात जणांना कारावास

Share

नंदुरबार । नंदुरबार येथे 2016 मध्ये  गणपती मिरवणुकीत नाचण्याच्या वादातून झालेल्या मारहाणप्रकरणी  जिल्हा व सत्र न्यायालयाने सात आरोपींना 2 महिने सश्रम कारावास व प्रत्येकी रुपये दोन हजार दंडाची शिक्षा सुनावली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, नंदुरबार येथे दि.5 जुन 2016 रोजी सावता फुले प्रेरीत व्यायाम शाळा तर्फे गणेश मुर्ती स्थापन मिरवणुक काढण्यात आली होती. मिरवणुकीत फिर्यादी आनंदा माळी याचा चुलत भाऊ गुलाब दंगल माळी यास मिरवणुकीत पंडीत कौतिक माळी, कमलेश राजेंद्र माळी अश्यांनी धक्का-बुक्की केली होती. तेव्हा आपसात बोलाचाल झाल्यानंतर व गणेश मुर्ती स्थापना झाल्यानंतर सायंकाळी 7.45 वाजता आनंदा माळी व त्याचा चुलत भाऊ महेंद्र दंगल माळी, कैलास हरी माळी, चेतन एकनाथ माळी, मनोहर रमेश माळी, युवराज साहेबराव माळी, असे प्रतिक माळी याच्या घराचे ओटयावर उभे असतांना विक्की ऊर्फ विशाल सुकदेव माळी, कमलेश राजेंद्र माळी, पावबा ऊर्फ हितेश न्हानु माळी, पंडीत कौतिक माळी, निलेश राजेंद्र माळी, प्रसाद सुकदेव माळी, निळकंठ भगवान माळी यांनी आनंदा माळी याचा चुलत भाऊ महेंद्र दंगल माळी यास शिवीगाळ करुन दादागिरी केली व सर्वांनी मिळून त्यास पकडून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली होती

तसेच विशाल सुकदेव माळी याने त्याच्या हातातील चाकुने पोटावर वार केला होता. नंतर महेंद्र दंगल माळी हा गंभीर दुखापती झाल्याने त्याच्या पोटातून रक्त निघत असल्याने त्यास उपचारकामी दाखल केले होते. याबात पावबा माळी यास देखील आरोपी क्र. 1 ते 7 यांनी एकत्रित येवुन मारहाण केली होती. दुखापती महेंद्र दंगल माळी यास आरोपी क्र.1 ते 7 अश्यांनी शिवीगाळ,दमदाटी करुन लाथा बुक्क्यांनी मारहाण करुन जीवघेणा हल्ला करुन गंभीर दुखापती केले होते. अश्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच सदर खटल्यात पैरवी अधिकारी म्हणुन पोना गिरीष पाटील व पोना नितीन साबळे यांनी कामकाज केले आहे. तपास अधिकारी व सरकारी वकील यांचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत व अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी अभिनंदन केले आहे.

सदर खटल्याचे कामकाज अभियोग पक्षातर्फे सरकारी वकील अ‍ॅड.व्ही.सी.चव्हाण यांनी पाहिले आहे.

तीन वर्ष चालली सुनावणी

सदर खटल्याची सुनावणी अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश आशुतोष भागवत यांच्या कोर्टात होवुन आरोपी विक्की ऊर्फ विशाल सुकदेव माळी, कमलेश राजेंद्र माळी,पावबा ऊर्फ हितेश न्हानु माळी, पंडीत कौतिक माळी, निलेश राजेंद्र माळी, प्रसाद सुकदेव माळी, निळकंठ भगवान माळी सर्व रा.माळी वाडा ता.जि.नंदुरबार यांच्याविरुध्द गुन्हा शाबीत झाल्याने त्यांना 2 महिने सश्रम कारावास व प्रत्येकी रुपये दोन हजार दंडाची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयात दोषारोपपत्र पो.स.ई. यादव भदाणे यांनी सादर केले होते.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!