Type to search

नंदुरबार

62 लाखांचा निधी हडप; बंधारे सरपंच व ग्रामसेवकांसह चौघांविरुद्ध गुन्हा

Share

नंदुरबार । शासकीय निधीची 61 लाख 83 हजार 204 रुपये धनादेशाद्वारे वटवून शासनाची तसेच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांची फसवणूक केल्याप्रकरणी बंधारे ता.नवापूर येथील सरपंच, ग्रामसेवकांसह चौघांविरुद्ध नवापूर पेालीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.1 नोव्हेंबर 2011 ते 26 जुलै 2018 दरम्यान नवापूर तालुक्यातील बंधारे येथील ग्रामपंचायतीचे सरपंच हेमा हरिशचंद्र पाडवी, ग्रामसेवक रघुनाथ शिवाजी गावीत , सरला कृष्णा वसावे, नानसिंग अजनसिंग वसावे यांनी संगनमताने सरकारी निधीची रक्कम 61 लाख 83 हजार 204 रुपये धनादेशाद्वारे सेंट्रल बँक नवापूर व युनीयन बँक चिंचपाडा शाखेतून वेळोवेळी काढून ग्रामपंचायत सदस्य व गावातील लोकांची फसवणूक केली. सदर गुन्हा नवापूर कोर्टाकडून सीआरपीसी 156 (3) प्रमाणे आल्याने उशिराने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत बंधारे येथील नरपत गोविंद वळवी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक डी.एस.शिंपी करीत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!