Type to search

नंदुरबार

मोटारसायकल चोरी करणारी टोळी गजाआड

Share

नंदुरबार । मोटरसायकलींची चोरी करुन मध्यप्रदेशात विक्री करणार्‍या टोळीला येथील स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून चोरीच्या 8 मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत.

जिल्हयात मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरु होता. तपासादरम्यान पोलीस निरीक्षक किशोर नवले यांना मोटरसायकल चोरी करणारी शिंदखेडा येथील संशयीत व चोरलेल्या मोटरसायकलींची मध्यप्रदेश राज्यात विक्री करणार्‍या टोळीची गुप्त माहिती मिळाली होती.त्यानुसार किशोर नवले यांनी पथकासह दि.24 मे रोजी शहादा व म्हसावद पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलींग फिरत असतांना खेडदिगर बसस्थानक परीसरात एक इसम संशयीतरित्या मोटारसायकलवर फिरत असतांना दिसून आला. त्याची विचारपूस केली असता त्याने तुषार शालीग्राम कोळी, रा. म्हळसेर ता. शिंदखेडा जि. धुळे असे नाव सांगितले. त्यास सदर मोटर सायकलीच्या कागदपत्रांबाबत विचारपूस केली असता उडवाउडवीचे उत्तरे दिली. त्याची अधिक चौकशी केली असता त्याने सदर मोटरसायकल चोरीची असल्याचे सांगितले. नरडाणा, शिरपूर, धुळे व गुजरात राज्यातील सुरत येथून एकुण 5-6 मोटारसायकल चोरी करुन मध्य प्रदेश राज्यातील पानसेमल तालुक्यात विक्री केल्याची कबुली दिली. पानसेमल तालुक्यातील मोरतलई गावातील सागर ऊर्फ भाईजी संतोष सावळे याच्या ताब्यातून दोन होंडा शाईन, 1 सीटी 100 व एक बजाज कंपनीची पल्सर अशा एकुण 4 मोटर सायकली व जितेंद्र कैलास पाटील याच्या ताब्यातून एक होंडा शाईन व एक होंडा अ‍ॅक्टीवा अशा 2 मोटर सायकली हस्तगत करण्यात आल्या. तुषार शालीग्राम कोळी याने दि.15 मे 2019 रोजी चोरी केलेली होंडा शाईन कंपनीची मोटारसायकलचे पेट्रोल संपल्याने फेकुन दिल्याने पोनाराकेश मोरे यांनी सदर मोटारसायकलीस उपनगर पो.स्टे.च्या ताब्यात दिली असून उपनगर पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

2 लाख 40 हजार रुपये किमतीच्या एकुण 8 मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या असून तुषार शालीग्राम कोळी (वय-24 रा. म्हळसेर ता. शिंदखेडा जि.धुळे), सागर ऊर्फ भाईजी संतोष सावळे (वय-23), जितेंद्र कैलास पाटील (वय-25 दोन्ही रा. मोरतलई ता.पानसेमल जि. बडवाणी) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून नंदुरबार व धुळे तसेच गुजरात राज्यातील सुरत येथील मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकिस आले आहेत. त्यामुळे पोलीस अधीक्षक संजय पाटील यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या तपास पथकाला विशेष रोख बक्षीस जाहीर केले आहे.

सदर कामगिरी पोलीस निरीक्षक किशोर नवले, पोहेकॉ जगदीश पवार, प्रदिप राजपूत, विनोद जाधव, पोना विकास अजगे, पोशि राहुल भामरे, किरण मोरे, अविनाश चव्हाण, सतिष घुले, तुषार पाटील यांच्या पथकाने केली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!