Type to search

नंदुरबार

आतंकवाद घालवण्यासाठी शिक्षणाचा आधार घेणे गरजेचे – सुधीर वानखेडे

Share

नंदुरबार । आतंकवाद ही मानसिक विकृती आहे, ही विकृती घालविण्यासाठी आतंकवाद्यांचे मन परिवर्तन करण्यासाठी तरुणांनी शिक्षणाचा आधार घेणे गरजेचे आहे असे प्रतिपादन सहायक धर्मदायआयुक्त सुधिर वानखेडे केले.ते नेहरू युवा केंद्रातर्फे आतंकवाद विरोधी दिवस साजरा करण्यात आला त्यावेळी बोलत होते.

येथील नेहरू युवा केंद्र नंदुरबार व मनोज युवा फाऊंडेशन आष्टे यांच्या संयुक्त विद्यमाने आतंकवाद विरोधी दिवस या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून जिल्हा युवा समन्वयक अर्श कौशिक होते त्यांनी आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात आतंकवाद नियंत्रणासाठी भारतीय तरुणांनी आपले कर्तव्य, जवाबदारी ओळखली पाहिजेत. प्रशासनात जाऊन तरुणांनी दहशतवाद मिटविण्यासाठी वेगवेगळे उपाय सुचविणे गरजेचे आहे. यावेळी सहायक धर्मदायआयुक्त सुधिर वानखेडे यांनी सांगीतले की,

आतंकवाद ही मानसिक विकृती आहे, ही विकृती घालविण्यासाठी आतंकवाद्यांचे मन परिवर्तन करण्यासाठी तरुणांनी शिक्षणाचा आधार घेणे गरजेचे आहे.देशातील प्रत्येक युवकाने आंतकवादाशी लढण्यासाठी सज्ज असायला हवे,असे प्रतिपादन केले.मनोज युवा फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रा. डॉ. मनोज शेवाळे यांनी आतंकवादाची परिभाषा, कारणे सांगुन आतंकवाद विरोधी दिवसानिमित्त सखोल असे मार्गदर्शन केले.यावेळी सामुदाईक शपथ घेण्यात आली.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विजय वसावे यांनी केले.तर नेहरु युवा केंद्राचे राष्ट्रीय युवा स्वयंसेवक अश्विन गोसावी व चेतन सौपुरे यांनी कार्यक्रमाची सांगता केली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!