Type to search

नंदुरबार

नंदुरबार जिल्हयात सरासरी 67 टक्के मतदान

Share

नंदुरबार । नंदुरबार जिल्हयातील अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार व नवापूर या चार विधानसभा मतदार संघांसाठी आज मतदान प्रक्रिया घेण्यात आली. या चारही मतदार संघांमध्ये सरासरी 67 टक्के मतदान झाले.

जिल्हयातील अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार व नवापूर या चार विधानसभा मतदार संघांसाठी आज मतदान प्रक्रिया घेण्यात आली. या चारही मतदार संघांच्या निवडणुकीसाठी आज सकाळी 11 वाजेपर्यंत मतदारांमध्ये निरुत्साह दिसून आला. मात्र, दुपारी 2 वाजेनंतर मतदारांनी हळूहळू मतदानस्थळी गर्दी करण्यास सुरुवात केली. सकाळी 7 ते 9 या वेळेत अक्कलकुवा मतदार संघात 6.56 टक्के, शहादा 8.15 टक्के, नंदुरबार 7.6 टक्के, नवापूर 7.58 टक्के मतदान झाले. 11 वाजेपर्यंत अक्कलकुवा मतदार संघात 24.69 टक्के, शहादा मतदार संघात 22.75 टक्के, नंदुरबार मतदार संघात 19.21 टक्के, नवापूर मतदार संघात 27.4 टक्के मतदान झाले होते. 1 वाजेपर्यंत अक्कलकुवा मतदार संघात 42.46 टक्के, शहादा मतदार संघात 38.72 टक्के, नंदुरबार मतदार संघात 32.45 टक्के, नवापूर मतदार संघात 43.52 टक्के मतदान झाले होते. 3 वाजेपर्यंत अक्कलकुवा मतदार संघात 52.56 टक्के, शहादा मतदार संघात 51.53 टक्के, नंदुरबार मतदार संघात 43.85 टक्के, नवापूर मतदार संघात 59.49 टक्के मतदान झाले होते. 5 वाजेपर्यंत अक्कलकुवा मतदार संघात 65.16 टक्के, शहादा मतदार संघात 62.37 टक्के, नंदुरबार मतदार संघात 53.26 टक्के, नवापूर मतदार संघात 71.44 टक्के मतदान झाले होते.

सायंकाळी 6 पर्यंत जेवढे मतदार मतदानासाठी आले होते. त्यांना मतदान कक्षात प्रवेश देण्यात आला. त्यानंतर काही ठिकाणी हे मतदान सात ते आठ वाजेपर्यंत सुरु होते. त्यामुळे अंतीम आकडेवारी मिळू शकली नाही. परंतू तरीही जिल्हयात सरासरी 67 टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे. सर्वाधिक मतदान नवापूर मतदार संघात तर सर्वात कमी मतदान नंदुरबार मतदार संघात झाले.

जिल्हाधिकार्‍यांनी केले सपत्नीक मतदान
नंदुरबार येथील जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी सपत्नीक मतदान केला. तत्पुर्वी डॉ.भारुड हे सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे शहरातील चव्हाण चौकातील पालिका शाळा क्रमांक 11 या मतदान केंद्रात रांगेत उभे होते. पंधरा वीस मिनीटे रांगेत उभे राहिल्यानंतर त्यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला. मतदान केल्यानंतर त्यांनी सेल्फी पॉईंटवर जावून छायाचित्रही काढले. तसेच मतदारांना मतदानाचे आवाहन केले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!