Type to search

नंदुरबार

नंदुरबार जिल्ह्यात मतदार जागृतीसाठी जि.प.शाळांचा पुढाकार

Share

नंदुरबार । विधानसभा निवडणूकीत मतदानाच्या टक्केवारीत जिल्ह्याला प्रथम स्थान मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप कार्यक्रम राबविण्यात येत आहे. जिल्हा परिषद शाळांनी या उपक्रमात मोठ्या संख्येत सहभाग घेतला असून गावागावातून मतदानाचा जागर होत आहे.

रॅली, स्पर्धा, पथनाट्य आणि प्रत्यक्ष भेटीच्या माध्यमातून ग्रामस्थांना मतदानाचे महत्व पटवून देण्यात येत आहे. अक्कलकुवा-धडगावच्या दुर्गम भागातील शाळांनीदेखील उत्साहाने विविध उपक्रम राबविले आहेत. नेमसुशिल श्रीमोती माध्यमिक विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय तळोदा येथे मानवी श्रृंखला तयार करून मतदानाचा संदेश देण्यात आला. प्रा.भाईसाहेब गो.हु.महाजन हायस्कुल आणि शि.ल.माळी कला विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, सावित्रीबाई फुले प्राथमिक विद्यामंदिर व भाईसाहेब जी.एच.महाजन इंग्लिश मिडियम स्कुलच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या मानवी श्रृंखलेनेदेखील मतदारांचे लक्ष आकर्षित केले. यावेळी मतदार जागृतीची शपथ घेण्यात आली.विद्यार्थ्यांसोबत शिक्षकदेखील उत्साहाने विविध उपक्रमात सहभागी होत आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांकडून राबविलेले कल्पक उपक्रम मतदारांना प्रोत्साहीत करणारे ठरत आहेत. मतदार जागृतीसाठी प्रत्येक गाव आणि पाड्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात येत असून शिक्षणाधिकारी एम.व्ही.कदम, उपशिक्षणाधिकारी डॉ.युनूस पठाण, सहा. शिक्षण उपनिरिक्षक दिनेश देवरे हे यासाठी विशेष प्रयत्न करीत आहेत.

शहादा संकल्प ग्रुपतर्फे मतदान जनजागृती
शहादा । ता.प्र.- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 150 वी जयंती व स्व.पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून शहादा शहरात सन्मित्र क्रीडा मंडळ व संकल्प ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने प्लास्टिक पिशवी निर्मुलन आणि मतदारांमधे मतदान जनजागृतीसाठी शालेय विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली काढण्यात आली.

या रॅलीत सन्मित्र क्रीडा मंडळाचे अध्यक्ष प्रा.ज्ञानी कुलकर्णी, संपत कोठारी, संकल्प ग्रुपचे अध्यक्ष शिवपाल जांगिड, प्रतिमा माळी, प्रा लियाकतअली सैय्यद, महेंद्र चौधरी, राकेश कोचर, प्रशांत कदम, ऋतुराज सुराणा आदी उपस्थित होते. सुरूवातीला प्रा.ज्ञानी कुलकर्णी व संपत कोठारी यांनी प्लास्टीक हटावबाबत मार्गदर्शन केले. येत्या निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी आपण सर्वानी जनजागृती करावी असे आवाहन केले. प्लास्टिक पिशवी हटाव याबद्दल शिवपाल जांगिड यांनी उपस्थितांना शपथ दिली. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळास पुष्प अर्पण करून रॅलीला प्रतिमा माळी यांनी हिरवा झेंडा दाखवून सुरूवात केली.

प्लास्टिक पिशवी निर्मुलनाच्या घोषणा आणि मतदान जनजागृतीच्या घोषणा सहभागी विद्यार्थ्यांनी दिल्या. बाजारातील दुकानदार, फेरीवाले यांना प्लास्टिक पिशवी वापर न करण्याचे आवाहन करण्यात आले. त्याबरोबर मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. मार्गावर डॉ.आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या पुतळास पुष्प अर्पण करून वंदन करण्यात आले.

शहाद्यातील मुख्य रस्त्यावरून रॅली निघून नगरपालिका कार्यालय चौकात समाप्ती झाली. रॅली यशस्वी करण्यासाठी प्रतिभा बोरसे, समीर जैन, ललिता राठोड, नयना पाटील, सुनंदा तांबोळी, उमेश पाटील, भालचंद्र पाटील, वसीम खाटिक, रजेसिंग भिल, डुडवे, वकार शेख,पाटील यांनी सहकार्य केले. व्हॉलंटरी प्राथमिक शाळा, लाडकोरबाई प्रा.शाळा, शेठ व्ही.के.शहा विद्यालय, सर सैय्यद उर्दू गर्ल्स स्कूल, नगरपालिका शाळा आदी शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

रॅलीत सहभागी झाल्याबद्दल प्रतिभा बोरसे यांनी सहभागी सर्व शाळा व शिक्षकांचे आभार व्यक्त केले. नागरीकांनी मोठया संख्येने मतदार करावे असे आवाहन जि.प.शाळ व विविध पथकांतर्फे विद्यार्थ्यांनी जनजागृती केली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!