Type to search

नंदुरबार

नंदुरबार शहरात सिटीबस सुरू करण्याची आवश्यकता

Share

नंदुरबार । नंदुरबार शहर हे झपाटयाने वाढत आहेत.त्याच सोबत प्रशासकीय कार्यालय शहराबाहेर असल्याने तसेच अनेक महत्वाची ठिकाणे लांबच्या अंतरावर असल्याने नागरिकांना खासगी वाहनाने जावे लागत असून आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. यामुळे शहरात सिटीबस सुरु करण्यात यावी अशी मागणी नागरिक करीत आहेत.

नंदुरबार हे जिल्ह्याचे ठिकाण असून दिवसेंदिवस शहर हे झपाटयाने वाढत आहे.यासह सर्व प्रशासकीय कार्यालये या ठिकाणी आहेत. यामुळे जिल्हाभरातून विविध कागदपत्रांसह दाखल्यांसाठी दररोज हजारो नागरिक येथे येतात. सर्वच नागरिकांकडे स्वतःचे वाहन नसल्याने एस. टी.महामंडळाच्या बसचा आधार घेतला जातो. बसस्थानकावर उतरल्यानंतर मात्र प्रशासकीय कार्यालयांकडे जाण्यासाठी वेळेवर बस नसल्याने अनेकांना ताटकळत रहावे लागते. तर काही जण काम अत्यावश्यक असल्याने खासगी वाहनाने प्रवास करुन प्रशासकीय कार्यालये गाठतात. यामुळे त्यांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. नंदुरबार शहराबाहेर जिल्हा परिषद, समाजकल्याण कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, न्यायालय, जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालय, लघु पाटबंधारे विभाग, मध्यम प्रकल्प, प्रकल्प कार्यालय,उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, जात पडताळणी कार्यालय अशी सर्वच कार्यालये शहराबाहेर आहेत.

यामुळे नंदुरबार शहरातील मध्यवर्ती स्थानापासून सुमारे चार ते पाच कि.मी.अंतरावर असणार्‍या कार्यालयापर्यंत पोहचतांना नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागतो. तसेच जिल्हा रुग्णालय देखील शहराबाहेर असल्याने अनेक रुग्ण येथे उपचारासाठी दाखल असतात. यामुळे रुग्णांचे कुटुंबिय, नातेवाईक यांना जिल्हा रुग्णालय गाठतांना समस्यांचा सामना करावा लागतो. बर्‍याचदा खासगी वाहनधारक गरज ओळखून अव्वाच्यासव्वा भाडे आकारत असल्याने नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. यामुळे नंदुरबार शहरात शालेय वेळेमध्ये शहरातील महत्वाच्या चौकांमधून विद्यार्थ्यांची वाहतूक केल्यास पालकांनाही दिलासा मिळणार आहे.

बर्‍याचदा रिक्षांमधून विद्यार्थ्यांची जीवघेणी वाहतूक सुरु असते. यामुळे अपघात देखील घडले आहेत. सिटीबस सुरु झाल्यास शालेय वेळेत विद्यार्थ्याची ने-आण केल्यास विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न देखील सुटणार आहे. यामुळे नंदुरबार शहरात सिटीबस सुरु करावी, अशी मागणी नागरिकांसह पालकवर्गातून देखील करण्यात येत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!