Type to search

maharashtra नंदुरबार

अंगणवाडी केंद्रांच्या माहितीसाठी कॉमन अ‍ॅप्लिकेशन सॉफ्टवेअर अ‍ॅप

Share
चिनोदा ता.तळोदा । दि.16। वार्ताहर – शासनाने कॉमन अ‍ॅप्लिकेशन सॉफ्टवेअर हे अ‍ॅप विकसित केले असून आता या अ‍ॅप्समध्ये अंगणवाडीची सर्व माहिती अपलोड करावी लागणार आहे. कॉमन अ‍ॅप्लिकेशन सॉफ्टवेअर या सॉफ्टवेअरचा भारतामध्ये याचा प्रयोगीक तत्वावर मध्यप्रदेश व उतराखंड येथे सुरू करण्यात आला असून तो आता संपूर्ण महाराष्ट्रात लागू करण्यात आला आहे.त्यामुळे अंगणवाडी केंद्र स्मार्ट होतील असे प्रतिपादन बी.यु.बोरकर यांनी केले

महिला व बालकल्याण विभाग एकात्मिक बालविकास सेवायोजना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने चिनोदा बीट अंतर्गत 29 अंगणवाडी सेविकांचे प्रशिक्षण घेण्यात आले. या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन नंदुरबार जि.प.उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा महिला बालकल्याण अधिकारी बापूराव भवाणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बालविकास प्रकल्प अधिकारी, तळोदा बी.यु.बोरकर, विस्तार अधिकारी सांख्याकिक एच.आर.गावीत, एम.बी.पवार , जगदीश कोळी, तसेच मास्टर ट्रेनर के.डी.पाकळे व सुनंदा वळवी आदी उपस्थित होते.यावेळी बापूराव भवाणे यांनी सांगितले की,

पहिले अंगणवाडी सेविकांना अंगणवाडी बाबतची सर्व माहिती ही एका रजिस्टर वहीत लिहून ठेवावी लागत होती. मात्र आता शासनाने कॉमन अ‍ॅप्लिकेशन सॉफ्टवेअर हे अ‍ॅप विकसित केले असून आता या अ‍ॅपमध्ये तुमच्या अंगणवाडीची सर्व माहिती अपलोड करावी लागणार आहे. यासाठी प्रत्येक अंगणवाडी सेविकांना अँडराईड मोबाईल फोनचे वाटप करण्यात आले असून त्यात सिमकार्ड, मेमरी कार्ड तसेच नेट बॅलेन्सची सुविधा देण्यात आली आहे.

तसेच अंगणवाडी केंद्रासाठी कोड नंबर देण्यात आला आहे. शासनाने या अ‍ॅप्समध्ये प्रत्येकांचे आधार कार्ड लिंक सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून यामुळे कामात पारदर्शकता येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या कॉमन अ‍ॅप्लिकेशन सॉफ्टवेअर या सॉफ्टवेअरचा भारतामध्ये याचा प्रयोगीक तत्वावर मध्यप्रदेश व उतराखंड येथे सुरू करण्यात आला असून तो आता संपूर्ण महाराष्ट्रात लागू करण्यात आला आहे.

त्यामुळे आता अंगणवाडी सेविकांना अंगणवाडीची माहिती ही रजिस्टरमध्ये न लिहिता मोबाईलच्या या कॉमन अ‍ॅप्लिकेशन सॉफ्टवेअर अ‍ॅप्समध्ये अपलोड केल्यानंतर सदर माहिती लाईव्ह व त्वरित पुढे जाईल. असे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच या प्रशिक्षणाच्या मास्टर ट्रेनर के.डी.पाकळे व सुनंदा वळवी यांनी सर्व अंगणवाडी सेविकांना कॉमन अ‍ॅप्लिकेशन सॉफ्टवेअर हे मोबाईल अ‍ॅप कसे डाऊनलोड करावे व त्यांचा उपयोग कसा करावा. तसेच या अ‍ॅपमध्ये आपआपल्या अंगणवाडीची माहिती कशी अपलोड करावी. हे मोबाईल अ‍ॅप कसे हाताळायचे याविषयीची सविस्तर माहिती अंगणवाडी सेविकांना या प्रशिक्षण शिबिरात देण्यात आले. यामुळे आता सर्वच अंगणवाडी केंद्र स्मार्ट होणार आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!