Type to search

maharashtra नंदुरबार मुख्य बातम्या

नंदुरबारात विचित्र अपघातात तरुणीचा मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्तारोको

Share

नंदुरबार ।भरधाव वेगातील स्कॉर्पिओने पाच वाहनांना उडविल्याने अपघातात तरुणीचा मृत्यू झाला असून एक तरुणी जखमी झाली आहे. काल रात्री शहरातील कल्याणेश्वर मंदिराजवळ ही घटना घडली. दरम्यान संतप्त झालेल्या मयत युयवतीच्या नातेवाईकांनी स्कॉपिओ वाहनावर आपला रोष व्यक्त करून दगडफेक केली. तसेच आज कल्याणेश्वर मंदिराजवळ रास्तारोको करुन स्कॉर्पिओ चालकावर कारवाईची मागणी केली. दरम्यान, मयत तरुणींवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नातेवाईकांनी तीव्र आक्रोश केला.

याबाबत वृत्त असे की, दि.15 रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास भरधाव वेगातील स्कॉपिओ (क्र.एम.एच.18-पी.356) ने समोरून येणार्‍या रिक्षा (क्र.एम.एच.39- जे 4923), अ‍ॅक्टिव्हा दुचाकी (क्र.एम.एच.39- क्यु. 2711) स्कुटी (क्र. एम.एच.39- 5780), शाईन (क्र.एम.एच.39- ए.ई.3059) या चौघा वाहनांना भरधाव वेगात उडविले. अपघात इतका भीषण होता की, अ‍ॅपेरिक्षा उलटून स्कुटीचा चक्काचूर झाला. अपघातानंतर जखमींना तात्काळ जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान स्कुटीस्वार प्रतिभा संजय मच्छले (19) हिचा नंदुरबार जिल्हा रूग्णालात मृत्यू झाला. तर आदिती राजेश मच्छले ही युवती जखमी झाली. अपघातात प्रतिभा (परी) मच्छलेचा मृत्यू झाल्याचे वृत्त पसरताच संतप्त नातेवाईकांनी घटनास्थळी येत स्कॉर्पिओ वाहनावर दगडफेक केली. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. याठिकाणी पोलीस पथक दाखल झाल्याने संतप्त जमावाला शांततेचे आवाहन केले. उपजिल्हा रूग्णालात नातेवाईकांसह समाज बांधवांनी गर्दी केली होती. आरोपीला अटक करण्याची मागणी केली. संतप्त जमावाची उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. श्री. पवार यांनी सांगितले, स्कॉर्पिओ चालक अशोक फुला वेंडाईत (पाटील, रा.छडवेल) हा पोलीस ठाण्यात हजर झाला असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय तुळशीराम मच्छले यांनी फिर्याद दाखल केली असून चालकावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, से आश्वासन दिल्यानंतर जमाव शांत झाला.

दरम्यान, मयत प्रतिभा मच्छलेच्या नातेवाईकांनी नंदुरबार जिल्हा रूग्णालयात अक्रोश केला. मयत परी मच्छले ही आदिती राजेश मच्छले हिच्यासोबत मैत्रिणीच्या वाढदिवसासाठी दंडपाणेश्वर येथे गेली होती. वाढदिवसाचा कार्यक्रम आटोपून त्या दोन्ही घराकडे परतत होत्या. परंतू अवघ्या काही मिनीटातच काळाने त्यांच्यावर झडप घातली. परी मच्छलेच्या अपघाती निधानाचे वृत्त गौतमनगर परिसरात कळताच एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मयरती मच्छले व जखमी आदिती मच्छले या दोन्ही डी.आर. कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत होत्या.

घटनेला जबाबदार स्कॉर्पिओ चालकाला अटक करुन त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी आज संतप्त नागरिकांनी कल्याणेश्वर मंदिराजवळ रास्तारोको आंदोलन केले. त्यामुळे परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलीसांनी त्यांना शांततेचे आवाहन केले. सध्या गावात शांतता आहे.

घटना घडल्यानंतर आज कल्याणेश्वर मंदिराच्या वळण रस्त्यावर तीन गतिरोधक बसविण्यात आले आहेत. जखमी तरुणीच्या प्रकृतित सुधारणा होत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!