Type to search

maharashtra नंदुरबार

वाढत्या तापमानामुळे थंडपेयांना मागणी वाढली

Share
नंदुरबार । वाढत्या तापमानामुळे जिव्हाची काहीली क्षमविण्यासाठी सध्या नंदुरबार शहरात रसवंतीसह ज्युस सेंटरवर ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून ज्युस सेंटरवर असलेल्या मँगो, पायनापल व स्टॉबेरी ज्युसला विशेष मागणी आहे.

नंदुरबार शहरात ठिक ठिकाणी अशा प्रकारचे रसवंती व ज्युस सेंटर सुरू करण्यात आले असून त्याचा फायदा एैन उन्हाच्या वेळी उष्णतेने त्रासलेल्या लोकांना निश्चित पणे होत आहे. 10 रूपयात एक ग्लास थंड फळांचा रस हा प्रकृतीला हित कारक असल्याने अनेक जण दुपारच्या वेळात फळांचा रस घेणे पसंत करतात. शित पेयांमध्ये कोल्ड्रींग्स,लस्सी, आईस्क्रीम, गोला, ऊसाचा रस, ताक या सारख्या अनेक गोष्टी बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. परंतु फळांचा रस हा शरिराला पुरेसे ग्लुकोज देत असल्याने उन्हाळ्यात फळे जास्त खावीत असा आग्रह डॉक्टर देखील करत असतात. अनेकांना प्रत्येक्ष फळ खाणे आवडत नाही. पण फळांचा रस घेणे मात्र सर्वांनाच आवडतो. मोसंबी,संत्री यांचे रस महागळे असल्याने ते सर्व सामान्यांना परवडत नाही. परंतू मॅगो व पायनापल ज्युस हे सर्व सामान्यांच्या खिशाला परवडणारे असल्याने त्याची मागणी जास्त आहे.

शहरातल्या मुख्य बाजारपेठेत अशा प्रकारचे मॅगो व पायनापल ज्युस सेंटर ठिक ठिकाणी सुरू करण्यात आले आहेत. फळांच्या रसा बरोबरच ऊसाच्या रसाला देखील चांगली मागणी असून ठिकठिकाणी ऊसाच्या रसांची दुकाने थाटण्यात आली आहे. विशेषतः बसस्थानक, बाजारपेठ याठिकाणी ऊसाच्या रसांची मागणी ही अधिक असते. त्यामुळे शहरात ग्रामीण भागात अनेक बेजरोजगार युवकांना देखील रोजगार उपलब्ध होतो. सर्व सामान्यांना परवडणारे असे हे पेय व आरोग्यास चांगले असल्याने उन्हाळ्याच्या दिवसात ऊसाचा रस घेणे अनेक जण पसंत करतात.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!