Type to search

maharashtra नंदुरबार

क्षमता बांधणी प्रशिक्षण उत्साहात

Share
नंदुरबार । राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियान अंतर्गत लोकनियुक्त सरपंचाचे क्षमता बांधणी प्रशिक्षण 2019-20 ला जळगांव येथे नुकतेच पार पडले, यात जिल्ह्यातील लोकनियुक्त सरपंच मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग अधिसुचने नुसार महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 मधील तरतुदीनुसार थेट निवडून आलेल्या सरपंचावर अधिक जबाबदारी टाकण्यात आलेली आहे. सदरिल सरपंचानी आपल्या कार्यालयामध्ये ग्रामविकासाचे काम अधिक प्रभाविपणे करणे करिता राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियान अंतर्गत क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले होता.पंचायतीचे थेट निवडून आलेल्या सरपंचाना दि. 10 मे ते 12 मे या कालावधीत गांधी रिसर्च फांडेशन जैन इरिगेशन जळगांव येथे प्रशिक्षण देण्यात आले. याप्रशिक्षण शिबीरात जळगांव, धुळे,नंदुरबार येथील लोकनियुक्त सरपंच उपस्थित होते.

शिबीरात वेगवेगळया तज्ञांनी लोकनियुक्त सरपंचांना कार्यालयामध्ये, गावांमध्ये विविध योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी योजनांची माहिती दिली. त्यासोबत पेसा अंतर्गत असलेल्या गावांसाठी विविध योजना व ग्रामविकास करण्यासाठी लागणारी माहिती यावेळी देण्यात आली. या शिबीरात तीन दिवसात वेगवेगळया सत्राचे आयोजन करण्यात आले होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!