Type to search

नंदुरबार राजकीय

केलेली कामेच आपल्या विजयाचे भांडवल असतात : आ. सुरुपसिंग नाईक

Share

नवापूर । वि.प्र.- निवडणुकीच्या काळात गर्दी घेऊन फिरल्याने मतदारराजाला प्रसन्न करता येत नाही. आपण केलेली कामे हीच आपल्या विजयाचे भांडवल असते. राजकारणात गेली पन्नास दशके मी काँग्रेसचा निष्ठावंत सैनिक म्हणून वावरत आहे. त्यामुळे मतदार सदैव माझ्या पाठीशी उभा राहिला. कारण मी आयुष्यात कोणाचेही मन दुखावले नाही, कोणाला कधी खोटे आश्वासन दिले नाही. मी जे बोलतो तेच करतो त्यामुळे यापुढेही माझा वारसा चालवणारे शिरीषकुमार नाईक हेच या मतदार संघात विजयी होतील, असा विश्वास आ.सुरुपसिंग नाईक यांनी व्यक्त केला.

नवापूर येथील काँग्रेसचे उमेदवार शिरीषकुमार नाईक यांच्या उमेदवारीबाबत भुमिका मांडतांना आ.नाईक म्हणाले, राजकारण म्हणजे हुल्लडबाजी नसते. निवडणुकीच्या काळात गर्दी घेऊन फिरल्याने मतदारराजाला प्रसन्न करता येत नाही. आपण केलेली कामे हीच आपल्या विजयाचे भांडवल असते. पन्नास वर्षाच्या दीर्घ काळात छोट्या छोट्या अपयशाने मी कधी खचलो नाही. माझ्यासारखा एका खेडेगावातील तरुणामधील गुण काँग्रेस पक्षाने ओळखून गल्लीतल्या माणसाला दिल्लीपर्यंत पोहचवले. काँग्रेस पक्षाने सोयी सवलती देणारे कायदे काँग्रेसने केले. अनुदानाच्या विविध योजना काँग्रेसनेच दिल्या. त्यामुळे जनता आतादेखील काँग्रेसच्या पाठीशी राहील. कारण या सरकारने खोटी आश्वासने दिली आहेत. शेतकर्‍यांना, सामान्य जनतेला त्रास देण्याचे काम केले आहे.

पण पैशाच्या जोरावर सारेच काही घडत नसते. राजकारणात जो माणूस फक्त पैशाच्या गोष्टी करतो तो जास्त काळ टिकत नाही. केवळ निवडणुका लढवणे हे आमचे उद्दीष्ट नाही. समाजातला प्रत्येक माणूस गरीब माणूस शिक्षण घेऊन नोकरीला लागला पाहिजे, मोठा झाला पाहिजे, त्याला आरोग्य पाणी वीज यासारख्या सुविधा मिळाल्या पाहिजेत, यासाठी प्रयत्न करीत असतो. या निवडणुकीत काय होईल असे लोक विचारतात मी त्यांना सांगतो मतदार हे उत्तर त्यांना मतदानातून उत्तर देतील. त्यामुळे आता इतिहास रचण्यासाठी व माझा वारसा सुरु ठेवण्यासाठी शिरीषकुमार नाईक यांना विजयी करा, असे आवाहनही आ.नाईक यांनी केले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!