Type to search

Breaking News नंदुरबार मुख्य बातम्या

राजापूर येथील शिवण नदीला अचानक पूर

Share

नंदुरबार |  तालुक्यातील शिवण नदीला अचानक आलेल्या पूराच्या पाण्यात शेतातून परतणारे ६ जण राजापूर येथील फरशीवरून वाहून गेल्याची घटना घडली. सुदैवाने सर्वांना वाचवण्यात ग्रामस्थांना यश मिळाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आज दि.२२ रोजी दुपारी मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे सव्वा चार वाजेच्या  सुमारास शेतातून परत येणारे शेतमजूर धर्मा हेमा पवार, सविता धर्मा पवार, वंदना गोटू पवार, पाबीबाई बद्री राठोड, क्रिष्णा प्रभू जाधव, लालसिंग फुलू गावीत नदीच्या फरशीवरून नदी पार करीत असतांना अचानक पाण्याचा मोठा प्रवाह आला. क्षणात काही सुचण्याच्या अगोदर पाण्याच्या प्रवाहात वाहू लागले. त्यात ३ स्त्रिया व ३ पुरूषांचा समावेश होता. नदी गावाजवळच असल्याने एकच आरडाओरडा सुरू झाला. काही अंतरावर वाहून गेल्यानंतर प्रत्यक्षदर्शींनी लगेच नदीत उडी मारून वाहून जाणार्‍यांना नदीतून बाहेर काढले.

दरम्यान यावर्षी सततचा पावसाचा जोर पाहता नदी भरून वाहत आहेत. राजापूरवासीयांना नंदुरबारला जाण्यासाठी मोठे अंतर कापून जावे लागत आहे. नदीला कोणत्या वेळेस पूर येईल किंवा धरणातून केव्हा पाणी सोडले जाईल याची शक्यता नसते. प्रसंगी मोठी दूर्घटना होऊ शकते. राजापूर येथे मोठ्या पूलाची वारंवार मागणी होत असतांना प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. आज घडलेल्या घटनेमुळे सुदैवाने ६ जणांचे प्राण वाचले. या घटनेवरून धडा घेत प्रशासन राजापूरवासींयांचे समस्या लक्षात घेवुन सोडवतील अशा अपेक्षा गावकरी व्यक्त करीत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!