Type to search

नंदुरबार

आमिष देत अनेकांना फसवणार्‍या संशयितास अटक

Share

नंदुरबार | वयोवृध्द महिलांच्या परिवाराची माहिती काढून त्यांचा विश्वास संपादन करून शासकीय कार्यालयात मोठ्या अधिकार्‍यांशी ओळखी असल्याच्या भुलथापा देवून शासकीय मदत मिळवून देण्याचे आमिष देत __ अनेकांना ठगणार्‍या संशयितास स्थानिक गुन्हा अन्वेषणशाखेच्या पथकाने संशयितास ताब्यात घेतले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नवापूर येथील हुसेन जुम्मा शाह व रूकसानाबी हुसेन शाह हे वयोवृध्द दाम्पत्य दोन्ही मुले व सुनांसह दोन वर्षापासून सेवानिवृत्ती वेतनावर व घरगुती मसाला बनविण्याचे काम करून उदरनिर्वाह करीत होते. दि.२८ मे २०१९ रोजी रूकसानाबी या त्यांची सुन शकीला हिच्यासोबत मसाल्याचे साहित्य घेण्यासाठी नंदुरबार येथे आले होते. यावेळी रूकसानाबी यांना त्यांची मावशी  नवशादबी भेटल्या. नवशादबींसोबत एक अनोळखी इसम बोलत होता. सदर अनोळखी इसमाने रूकसानाबी यांनाही ओळखत असल्याचे सांगितले. मात्र रूकसानाबी यांनी ओळख नसल्याचे स्पष्ट नाकारले. मात्र तरीही अनोळखी इसमाने रूकसानाबी यांच्याशी ओळख |वाढविण्याचा प्रयत्न करून त्यांना

शासकीय मदत मिळवुन देण्याचे आमिष दाखविले. यामुळे रूकसानाबी, नवशादबी व शकीला अशा तिघा महिलांनी सदर अनोळखी इसमावर विश्वास ठेवला. त्याने लागलीच रिक्षाने तिघांना नंदुरबार तहसील कार्यालयात नेले. यावेळी तिघांच्या अंगावर असणारे दागिने बघितल्यास लाभ मिळणार नाही असे सांगुन एका पिशवीत तिघांचे दागिने काढून घेतले. अनोळखी इसमाने रूकसानाबी व नवशादबी यांना कार्यालयात घेवून जातांना दागिन्यांची पिशवी शकीला यांच्याकडे देवून मध्ये गेला. थोड्या वेळाने बाहेर येवुन शकीला यांना रूकसानाबी आत बोलवत असल्याचे सांगुन दागिन्यांची पिशवी स्वतःकडे ठेवून घेतली.

शकीला आत जाताच त्याने तेथून पोबारा केला. काही वेळाने तिन्ही महिला बाहेर आल्यावर सदरचा इसम बेपत्ता झाला होता. त्याची सर्वत्र शोधाशोध करूनही तो आढळून न आल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर उपनगर पोलिस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामुळे पोलिस त्याचा शोध घेत होते. दरम्यान सदरचा संशयित औरंगाबाद येथील असल्याचे समजल्याने स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पथक औरंगाबाद येथे रवाना झाले. औरंगाबाद येथील नेहरू नगरमधील कटकट गेटवर वेशांतर करून पथकातील कर्मचार्‍यांनी दोन दिवस त्याचा शोध घेवूनही तो आढळून आला नाही. मात्र पथक परतीच्या मार्गावर असतांनाच एका ठिकाणी सदरचा संशयित जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्यास ताब्यात घेतल्यावर विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव अहमदखान खलील अहमदखान असे सांगितले. त्याने जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तर नाशिक जिल्ह्यातील निफाड, बुलढाणा, चंद्रपूर, जालना, वाशिम येथे गुन्हा केल्याची कबुली दिली असून तो फरार होता. सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक महेंद्र पंडीत, अपर पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे किशोर नवले, पोहेकॉ.प्रदिप राजपूत, पोना.राकेश मोरे, पोशि विजय ढिवरे, अभय राजपूत यांच्या पथकाने केली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!