Type to search

क्रीडा नंदुरबार

राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत औरंगाबादने घेतली आघाडी

Share

नंदुरबार | तालुक्यातील पथराई येथील के.डी.गावित शैक्षणिक व क्रीडा संकुलात महाराष्ट्र राज्य फेन्सिंग असोसिएशन, नंदुरबार जिल्हा फेन्सिंग असोसिएशन व आदिवासी देवमोगरा एज्यूकेशन सोसायटी नटावद यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या सोळाव्या राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेच्या दुसर्‍या दिवशी औरंगाबाद जिल्ह्याने आघाडी घेतली आहे.

पथराई येथील सुसज्ज क्रीडा संकुलात सुरू असलेल्या राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेस ४६० खेळाडू सहभागी दाखल झाले असून त्यापैकी २४ खेळाडू राष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी निवडले जाणार आहेत. त्यामुळे खेळाडूंचा एकच थरार पहावयास मिळाला. स्पर्धेच्या दुसर्‍या दिवशी औरंगाबादसह नागपूर, मुंबई, सोलापूर, लातूर, बुलढाणा जिल्ह्यांनी आघाडी घेतली आहे.

यात औरंगाबादच्या कशिश भराड, नागपूरच्या आरूषी सिंग लुंबिनी मेश्राम व खुशी थटेरे, रायगडच्या वंशिका मोदी व मेहक रेवानी, मुंबईचा साहिल चव्हाण या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या खेळाडूंनी येथेही सर्वांचे लक्ष वेधून घेत चमकदार कामगिरी केली. यात नंदुरबार, वाशिम, सिंधुदूर्ग, वर्धा, अमरावती हे जिल्हे पिछाडीवर असून चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा आहे.

दुसर्‍या दिवशी दुपारी झालेल्या स्पर्धेतील विजेत्यांना उप मुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांच्या हस्ते बक्षिस वितरण व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. दुसर्‍या दिवस अखेर विजयी संघ असे

फोईल बॉयज टीम – औरंगाबाद, कोल्हापूर, उस्मानाबाद, मुंबई उपनगर, फोईल गर्ल्स टीम- नागपूर, औरंगाबाद, बुलढाणा, मुंबई, एपी बॉंयज टीम- भंडारा, मुंबई उपनगर, नागपूर, सोलापूर, एपी गर्ल्स टीम-लातूर, सोलापूर, धुळे, रायगड, सेबर गर्ल्स टीम- औरंगाबाद, रायगड, नागपूर, लातूर.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!