Type to search

नंदुरबार

शासकीय कृषी महाविद्यालयात शेततळ्यातील मत्स्य संवर्धन या विषयावर मार्गदर्शन

Share

नंदुरबार | नंदुरबार जिल्हयात मोठया प्रमाणात मत्स्यशेतीचा कल वाढत असुन यामध्ये माशांचे संवर्धन करुन विक्री केली जात आहे. सध्या मत्स्यशेतीसाठी मत्स्य बिज आंधप्रदेश व पश्चिम बंगाल येथुन आयात केले जात असुन खान्देशात मत्यबिज निर्मितीसाठी मोठा वाव आहे.असे प्रतिपादन डॉ. किरण पाडवी यंानी केले.

शासकिय कृषि महाविद्यालय, नंदुरबार येथे शेततळयातील मत्स्य संवर्धन या विषयावर मागदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी व्यासपीठावर सहाय्यक आयुक्त, जिल्हा मत्स्य व्यवसाय विकास विभाग, नंदुरबार डॉ.किरण पाडवी,  मत्स्य उत्पादक लोणखेडा संगिता पाटील, उपसंचालक कृषि विभाग एम. एस. रामोळे, हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता, डॉ. एस.बी.खरबडे हे होते.

यावेळी डॉ.पाडवी म्हणाले की, मत्स्यशेती हा कृषिचाच एक भाग असुन आधुनिक मत्स्य शेतीला नविन तंत्रज्ञानाची जोड दिल्यास शेतकर्‍यांना अधिक उत्पादन मिळु शकते. सध्या नंदुरबार जिल्हयात मोठया प्रमाणात मत्स्यशेतीचा कल वाढत असुन यामध्ये मरळ, पापदा, जिताडा इत्यादी माशांचे संवर्धन करुन विक्री केली जात आहे. सध्या मत्स्यशेतीसाठी मत्स्य बिज आंधप्रदेश व पश्चिम बंगाल येथुन आयात केले जात असुन खान्देशात मत्यबिज निर्मितीसाठी मोठा वाव आहे असे प्रतिपादन केले.

श्री.रामोळे यांनी कृषि विभाग अतर्ंगत राबविण्यात येणार्‍या जलसंवर्धन योजनांविषयी उपस्थितीतांना माहिती दिली. जिल्हयात मागेल त्याला शेततळे व सामुहीक शेततळे या योजने अंतर्गत शेतकरी मोठया प्रमाणात लाभ घेत असुन याव्दारे शेतकरी शेततळयात मत्स्यशेतीव्दारे अधिक उत्पादन घेत आहेत.सौ.पाटील आपल्या मागदर्शनपर भाषाणात म्हणाल्या की, संगणक युगात विद्यार्थ्यांनी सोशल मिडीयावर जास्त वेळ न घालवता भविष्याचे नियोजन करुन आपले ध्येय गाठावे. भविष्यातील नोकरीच्या अपुर्‍या संधी व कृषि तसेच कृषि संलग्न क्षेत्रात उद्योजग होणेसाठीचा वाव मोठा आहे.

विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करुन प्रगती साधावी असे आव्हान केले. या मार्गदर्शन कार्यक्रम प्रसंगी सौ. पाटील यांनी आपल्या लोणखेडा शहादा येथिल मस्त्य फार्म येथुन महाविद्यालयाच्या १.८० कोटी लि. क्षमतेच्या प्लास्टिक आच्छादित शेततळयात मत्स्य संवर्धनासाठी माशांची बोटुकली उपलब्ध करुन दिली. डॉ. खरबडे आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, कृषि महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठ विविध नाविन्य उपक्रम राबविण्यात येत असुन यातुन भविष्यत उत्तम उद्योजक व्हावेत यासाठी प्राध्यापकांव्दारे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले जात आहे.

भविष्यात विद्यार्थी स्वतःचा कृषि आधारीत उद्योग सुरु करतील यासाठी महाविद्यालय कटिबध आहे असे प्रतिपादन केले.या कार्याक्रमास महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक अधिकारी कर्मचारी तसेच विद्यार्थी व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विजय पाटील यांनी केले तर आभार प्रा.आर.एम. बिराडे यांनी मानले या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. संदिप राजपूत यांनी केले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!