Type to search

नंदुरबार

फटाके विक्री करणार्‍यांनी विस्फोटक नियमांचे पालन करावे

Share

नंदुरबार | दिपावली सणासाठी तात्पुरत्या स्वरूपात फटाका विक्री व साठवणूक करणार्‍या जिल्ह्यातील सर्व परवानाधारकांनी विस्फोटक नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक आहे.अटी व शर्तीचे परवानाधारकाने काटेकोर पालन करावे, असे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी अधिसुचनेद्वारे कळविले आहे.

विस्फोटक नियम १९८४ विस्फोटक नियम २००८ तरतुदीस अधिन राहून नमुना ईएल-५ मध्ये फटाका विक्री,ठेवणेकामी प्रत्येक स्टॉलसाठी दिला जाणारा परवाना दारू किंवा फटाक्यांसाठी १०० किलो कि.ग्रा. व  शोभेचे झकाकरणारे चायनीज फटाक्यांसाठी ५०० किलोग्रॅम एवढा परिमाणपेक्षा जास्त परिमाण बाळगता येणार नाही. प्रस्तावित आराखड्यातील शिफारस केलेले तात्पुरते फटाके विक्री स्टॉंलची संख्या एकाच ठिकाणी एकापेक्षा जास्त असल्यास दोन स्टॉल मधील अंतर तीन मीटर पेक्षा कमी नसावे. तसेच बाहेरील सुरक्षित अंतर पन्नास मीटर असल्यास दोन स्टॉल मधील अंतर तीन मीटर पेक्षा कमी नसावे. तसेच बाहेरील सुरक्षित अंतर पन्नास मीटर पर्यंत व अशी स्टॉल दोन किंवा दोनपेक्षा अधिक रांगेत असल्यास ती समोरासमोर पन्नास मीटर पेक्षा कमी अंतराची नसावी.प्रत्येक स्टॉलमधील फटाक्यांची एकूण परिमाणता ५०० कि.ग्रा.पेक्षा अधिक नसावी. प्रत्येक स्टॉलचे क्षेत्र १०-२० चौ.मी. पर्यंतचे असावे. एक किंवा त्यापेक्षा अधिक समांतर रांगांमधील दरवाजे समोरासमोर नसावेत व ते मागील बाजूने बंद असावे. फटाका विक्री स्टॉलमध्ये अग्नि उपद्रवास कारणीभूत ठरणार्‍या बाबी प्रतिबंधित असतील. फटाका विक्री स्टॉलच्या परिसरात धूम्रपान प्रतिबंधित असेल.  फटाका विक्री स्टॉलच्या ठिकाणी अग्निसुरक्षा व्यवस्था पुरेशा प्रमाणात असावी.अनपेक्षित घटना घडू नये म्हणून फटाका विक्री स्टॉलच्या परिसरात आणि त्याठिकाणी दक्षता पथकाची गस्ती असावी.

आपटून फुटणारे फटाक्यांना मान्यता नसल्याने अशा फटाक्यांच्या विक्रीस परवानगी असणार नाही. पर्यावरण सुरक्षा नियमाखालील परिपत्रकान्वये एखादा फटाका उडविण्याच्या जागेपासून ४ मीटर अंतरापर्यंत १२५ किंवा १४५ डेसिबल आवाज निर्माण करणार्‍या फटाक्यात एकूण चार मीटर अंतरापर्यंत ११५, ११० व १०५ डेसिबल एवढी असावी.  गाडीतून किंवा फिरत्या वाहनातून फटाके विक्रीस मज्जाव असेल तसेच मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३३ (१) (ह) नुसार ज्या फटाक्यांमुळे रहिवास किंवा जवळच्या परिसरातील प्रवासी/पादचारी यांना अडथळा, गैरसोय, जोखीम, त्रास, नुकसान होण्याचा संभव निर्माण होईल असे फटाके जवळ बाळगण्यास, विक्री करण्यास, सोडणे अगर फेकण्यास मनाई करण्यात येत आहे.   रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत दारूकाम व फटाके यांचा वापर करता येणार नाही.

शांतता झोनमध्ये रुग्णालय, शैक्षणिक संस्था, न्यायालये, धार्मिक,प्रार्थनास्थळे यांच्या सभोवतालचे १०० मीटर पर्यंतचे क्षेत्र येते, या प्रभागात कोणत्याही फटाक्याचा वापर कुठल्याही वेळेत करता येणार नाही. विस्फोटक नियम २००८ चे नियम ८४ नुसार परवाना मिळाल्याखेरीज कोणीही ही फटाका विक्री करणार नाही व मंजुरी दिलेल्या जागेवर फटाका विक्री वैध राहील.  परवान्याशिवाय फटाके विक्री करणे,ठेवणे आढळून आल्यास संबंधित व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल.   फटाका विक्री,साठवणूक परवाना मागणी अर्ज विहित नमुना-४ मध्ये असावा. विहित नमुन्यातील अर्ज वितरीत करण्यास सुरुवात झाली असून अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर पर्यंत राहील.

पोलीस विभागाने प्रस्तुत अर्जावर अभिप्राय कळविण्याची अंतिम मुदत ९ ऑक्टोबर असेल.  पोलीस विभागाकडील शिफारशीअंती मंजूर परवाने वितरण कालावधी १४ ऑक्टोबर ते १९ ऑक्टोंबर पर्यंत राहील.  फटाका विक्री परवाना विक्री, ठेवण्याचे ठिकाणी दर्शनी भागावर लावणे आवश्यक राहील.अर्जदार यांनी त्यांचे स्वतःचे दोन पासपोर्ट साईजचे फोटो अर्जासोबत सादर करावे.  विस्फोटक नियम २००८ आणि १८८४ तसेच स्फोटक विभागाने वेळोवेळी जारी केलेल्या अटी व शर्तीचे परवानाधारकाने काटेकोर पालन करावे, असे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी अधिसुचनेद्वारे कळविले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!