Type to search

नंदुरबार

नंदुरबार येथे पोषणमाह अभियानाचा शुभारंभ

Share

नंदुरबार | नंदुरबार येथे जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागातर्फे पोषणमाह अभियानाचा शुभारंभ खा.हिना गावित यांच्या हस्ते झाला.

केंद्र शासनाने सप्टेंबर महिना पोषणाचे पंचसुत्र म्हणुन साजरा करण्यात येत आहे.जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागातर्फे पोषण माह अभियानाचा शुभारंभ खा.डॉ. हिना गावीत यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा कार्यक्रम अधिकारी बापूराव भवाने, टविकास अधिकारी अशोक पटाईत उपस्थीत होते. पोषण माह अंतर्गत जनआंन्दोलन रॅली, पथनाटय, गाणी, रांगोळी इत्यादी विविध उपक्रम अंगणवाडी सेविका यांच्या मार्फत घेण्यात आले.

या प्रसंगी खा. डॉ. हिना गावीत म्हणाल्या की, नंदुरबार जिल्हा हा अतिदुर्गम जिल्हा असून सदर जिल्हयात कुपोषण, रक्तक्षयाचे प्रमाण कमी करण्यासाठी मोठया प्रमाणात जनजागृती करणे, सकस पोषण आणि स्वच्छतेविषयी माता व बालकांना मार्गदर्शन करणे . तसेच प्रधानमंत्री यांचा देशात पोषण अभियान राबविण्यात येत आहे. पोषण अभियानाची यशस्वीरित्या अंमलबजावणी केल्यास निश्चितचं कुपोषण कमी होण्यास मदत होईल. मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री. विनय गौडा यांनी उपस्थित अंगणवाडी सेविका व अंगणवाडी पर्यवेक्षिका यांना सप्टेंबर २०१९ मध्ये पोषण माह अंतर्गत होत असलेल्या विविध कार्यक्रमाबाबत प्रोत्साहन करुन यापुढे ही नियमित जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्यासाठी मार्गदर्शन केले. जिल्हयात पोषणमाह अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. कार्यक्रम यशस्वीतेकरिता बालविकास प्रकल्प अधिकारी. विनोद वळवी, विविध स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी व जिल्हा व तालुकास्तरीय अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!