Type to search

नंदुरबार

भाजपच्या सेवा सप्ताहांतर्गत उपक्रम; विद्यार्थ्यांना मिठाई, फळांचे वाटप

Share

नंदुरबार ा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त तळोदा नगरपरिषद कर्मचार्‍यांच्या सन्मान करण्यात आला असून, त्यांना कपड्यांचे वाटप जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले.

पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपतर्फे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त सर्वत्र समाजोपयोगी कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सोमवारी तळोद्यात शहराध्यक्ष योगेश चौधरी व तालुकाध्यक्ष यशवंत पाडवी यांच्यातर्फे नगरपरिषदेच्या कर्मचार्‍यांना कपडे व महिला कर्मचार्‍यांना साड्यांचे वाटप करण्यात आले.

यावेळी जिल्हाध्यक्ष विजय चौधरी म्हणाले, भाजप हा गोरगरिबांच्या विचार करणारा पक्ष आहे. निराश्रित, दलित, आदिवासी गोरगरीब, कामगार, झोपडपट्टीत राहणार्‍या जनतेप्रती पक्षाला आदर आहे. दारिद्ररेषेखालील कुटुंबांच्या विकास व्हावा ही भाजपाची भूमिका आहे. पक्षाच्या माध्यमातून लोककल्याणकारी अनेक योजना राबविण्यात येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य तन, मन, धनाने सेवेत घालविल्याने त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वत्र सेवा सप्ताहाच्या माध्यमातुन समाजोपयोगी कार्यक्रम राबविण्याच्या संकल्प भाजप कार्यकर्त्यांनी केला होता.

याप्रसंगी प्रदेश सदस्य डॉ.शशिकांत वाणी, नगराध्यक्ष अजय परदेशी, उपनगराध्यक्ष भाग्यश्री चौधरी, शहराध्यक्ष योगेश चौधरी, अशोक चौधरी, नगरसेवक रामानंद ठाकरे, अमानु शेख, प्रदीप शेंडे,जालिंदर भोई, शिवम सोनार, कृष्णा सोनार, अशिष जैन, भूषण राठोड, पंकज जैन आदी उपस्थित होते.

कोठार येथील अनंत ज्ञानदीप प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत प्रदेश सदस्य डॉ.शशिकांत वाणी यांच्यावतीने १६०० महिलांना साड्यांचे वाटप झाले. त्याचप्रमाणे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना फळे, भूषण वसतिगृहात मिष्ठान्न व जिल्हा परिषदेच्या केंद्र शाळेत मिठाईचे वाटप करण्यात आले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!