Type to search

नंदुरबार

अपघात प्रकरणी कमांडर गाडी चालकास दोन महिने कारावास व दहा हजार दंड

Share

नंदुरबार ा कमांडर जिपचा अपघात होवून एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याप्रकरणी चालकास दोन महिने साधा कारावास व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा अक्कलकुवा येथील न्या.करभजन यांनी सुनावली.

याबाबत अधिक माहिती अशी की, दि.१८ जानेवारी २०१६ रोजी कमांडर जिपगाडी (क्र.एमएच-१४ पी.२४१३) वरील चालक दिनेश रायसिंग वसावे (रा.बिजरगव्हाण) हा जिपगाडीत डिझेल भरण्यासाठी डेडीयापाडा (गुजरात) येथे जात होता. सदर गाडीत पिंपळखुटा येथे राहणारा किसन कागडया राऊत व त्याचा मुलगा असे वडफळी येथे दवाखान्यात जाण्यासाठी बसले होते. सदर गाडी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास मोकस गावाजवळील नालीबार वळणाजवळ आल्यानंतर गाडीचालक दिनेश रायसिंग वसावे याचा गाडीवरील ताबा सुटल्याने मोकस गावाजवळील नालीबार नाल्यात रोडाचे डावे बाजुस खोल खडयात खालून पलटी केली होती. कमांडर गाडी पलटी झाल्याने गाडीतील प्रवासी किसन कागडया राऊत हा गाडीतून खाली पडुन दुखापती होवुन तसेच मुकामार लागुन जागेवरच मयत झाला होता. तसेच गाडीतील इतर प्रवासी व स्वत: गाडी चालक दिनेश रायसिंग वसावे जखमी झाले होते. अश्या फिर्यादीवरुन मोलगी पोलीस ठाण्यात भादंविक.-३०४(अ),२७९, ३३७, मो.वा.का.क.-१८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर खटल्याची सुनावणी अक्कलकुवा येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आनंद दे. करभाजन यांच्या न्यायालयात होवून आरोपी दिनेश सायसिंग वसावे यांस न्यायालयाने भादविक- ३०४(अ) अन्वये २ महिने साधा कारावास व १० हजार रुपये दंड तसेच भादंविक-२७९ अन्वये रुपये १ हजार दंड व १ महिना साधा कारावास तसेच मो.वा.का.क. १८४ अन्वये १ महिना साधा कारावास व रुपये १ हजार दंड अशी शिक्षा सुनावली आहे.

या गुन्हयाचा सखोल तपास करुन आरोपीविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र पोसई/जीवन परदेशी यांनी सादर केले होते. सदर खटल्याचे कामकाज अभियोग पक्षातर्फे सहा.सरकारी अभियोक्ता ऍड.अजय सुरळकर यांनी पाहिले. पैरवी अधिकारी म्हणुन पोहेकॉ/ सतीदान राऊळ यांनी कामकाज केले आहे. तपास अधिकारी पोसई/जीवन परदेशी व सहा.सरकारी अभियोक्ता ऍड.अजय सुरळकर यांचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत व अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी अभिनंदन केले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!