Type to search

नंदुरबार

नंदुरबार येथे वॉकेथॉन उत्साहात

Share

नंदुरबार | स्थूलता व मधुमेह निवारण या बाबतीत प्रचार व जनजागृती व्हावी या उद्देशाने आज रोजी वॉकॅथॉन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी ५ किलोमीटर अंतर पायी चालून सुदृढ आरोग्य जपण्याचा संदेश देण्यात आला.

डॉ. जिचकार यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आज सकाळी ६.३० वाजता छोरिया रेसीडेन्सी पासून वॉकॅथॉन ची सुरवात झाली. काल रात्रीपासून मेघराज शांत होते. नावनोंदणी च्या वेळेस तुरळक पाऊस सुरू झाला होता. तरी आरोग्यप्रेमींचा उत्साह जोरात होता. साधारणत १५० सभासदांची नोंदणी करण्यात आली. तसेच काही जणांनी मधूनही सहभाग घेतला.६.४५ वाजता ज्येष्ठ नागरिक प्रफुल शाह यांच्या हस्ते श्रीफळ फोडून वॉकॅथॉन ची सुरवात करण्यात आली. भर पावसात ढोल वाद्य, तसेच देशभक्तीच्या जयघोषात वॉकॅथॉन पूर्ण झाली.यावेळी संजय अग्रवाल, डॉ अर्जुन लालचांदानी , जगदिश सोनी , चंदर मंगलानी, प्रकाश अग्रवाल, श्याम अग्रवाल ,किशोर वाघेला , मनोज सोलंकी, पंकज सोलंकी ,धनेश लूनावत, पप्पू सखला, सुनील जैन, संजय भदाने , जय श्रीराम ग्रुप चे सर्व सभासद उपस्थीत होते. कार्यक्रमासाठी जितेंद्र वाघेला, सुधीर वाणी व डॉ. जयंत शाह यांनी परिश्रम घेतले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!