Type to search

नंदुरबार

खा. डॉ. हिना गावीत यांना डेग्युची लागण

Share

नंदुरबार । नंदुरबार जिल्ह्यातील डेंग्यु सदृश्य आजाराने थैमान घातली आहे. नंदुरबारसह नवापूर येथे रूग्णांची संख्या वाढली आहे. भाजपाच्या खा.डॉ.हिना गावीत यांना डेग्यु सदृश्य आजाराची लागण झाली असल्याचे स्टेटस सोशल मिडीयावर वायरल केल्याने खा.डॉ.हिना गावीत यांनी काळजी घ्यावी असे मॅसेज दिवसभर सोशल मिडीयावर फिरत होते.

खा.डॉ.हिना गावीत डेंग्यु पॉझिटीव्ह असल्याचे स्टेटस सोशल मिडीयावर वायरल केले. त्यामुळे सोशल मिडीयावर खा.डॉ.हिना गावीत यांनी काळजी घ्यावी. असे मॅसेज टाकण्यात येत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील डेंग्यु सदृश आजाराने थैमान घातला आहे. नंदुरबार शहरात डेंग्यु सदृश्य तापाची साथ दिवसेंदिवस भिषण होत आहे. डेंग्युची लागण होवून 18 वर्षी युवती दगावल्याची घटना दि.8 ऑक्टोंबर रोजी घडली आहे तर नवापूर येथे 12 व 17 वर्षीय मुलांना डेंग्युची लागण झाल्याने त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

नंदुरबार व नवापूरमध्ये डेंग्युची लागण झालेले 100 च्यावर रूग्ण विविध खाजगी रूग्णांलयांमध्ये उपचार घेत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!