Type to search

नंदुरबार

राष्ट्रीय महामार्गावर धावत्या आयसरला लागली आग

Share

नवापूर । वि.प्र. – राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर धावत्या आयसर ट्रकला आग लागल्याने आयसर ट्रकसह लाखोंचा माल जळुन खाक झाला.सुरतहून बीड कडे कोल्ड्रिंक्स व कुरकुरे घेऊन जात असतांना पहाटेच्या वेळी द बर्निंग आयसर ट्रक चा थरारक चित्र महामार्गावर पाहायला मिळाले.

धुळे सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर आयसर ट्रक ( क्र. एम. एच.18 बी.जी. 1511) सुरत हुन बीड कडे जात असलेल्या आयसर ट्रकला अचानक आग लागली. या आगीत आयसर ट्रक व मालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ही घटना रविवारी पहाटे साडे पाच ते सहा वाजेच्या सुमारास नवापूर तालुक्यातील मोरकंरजा गावाच्या शिवारातील पीर बाबाच्या दर्गा जवळील पुला पुढे घडली. या ट्रकला अचानक आग लागली. ही घटना लक्षात येताच चालक गुलाब महाडिक याने ट्रक रस्त्याच्या बाजुला उभा करून कॅबीन मधून बाहेर उडी घेतली. त्यानंतर काही वेळातच ट्रकचा समोरील भाग आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. महामार्गवर ट्रक पेटल्यामुळे काही काळ वाहनाच्या रांगा लागल्या होत्या.

या घटनेची माहिती महामार्गावरील महामार्ग वाहतूक सुरक्षा पोलीस चौकी कर्मचारी यांना मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक रईस काझी, पोलीस कॉन्स्टेबल दिपक चौधरी, संदिप बारसे, पोलिस नाईक दिलीप चौरे, महेश बच्छाव यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली. महामार्गावरील वाहतूक सुरक्षितता म्हणून इतर वाहनांना लांबवर अंतरावर थांबवून जळणार्‍या आयसर ट्रक वर नियंत्रण मिळवण्यासाठी पाण्याचा मारा करून ट्रकची आग विझविण्यात आली. ट्रक विझविल्यानंतर पुन्हा या महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू करण्यात आली. या आगीमुळे पहाटेच्या वेळी महामार्गावर द बर्निंग आयसर ट्रक चा थरारक चित्र पाहायला मिळाले ही आग शॉटसर्कीट मुळे लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहेे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!