Type to search

नंदुरबार

आ.डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते लोंढे येथे जलपुजन

Share

जयनगर ता.शहादा | वार्ताहर- महात्मा ज्योतिबा फुले युवा मंच व ग्रामपंचायत लोंढरे यांच्या वतीने लोंढे येथील परिसरातील सर्वात मोठे असलेले म्हसर्डी धरणाचे जलपूजन माजी मंत्री आ.डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी धरण परिसरात निसर्गरम्य वातावरणासाठी वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. कांतीलाल टाटिया, महात्मा ज्योतिबा फुले युवा मंच संस्थापक अध्यक्ष ईश्वर माळी,भाजपचे अशोक माळी, माजी पंचायत समिती सदस्य भगवान पाटील, पाटबंधारे विभागाचे उपअभियंता पी.एस सोमवंशी, शाखा अभियंता जी.बी गोसावी ,वन विभागाचे अधिकारी, किशोर माळी उपस्थित होते. गेल्या दहा ते बारा वर्षापासून हे धरण पहिल्यांदा फुल भरले असून,सांडव्यातून पाणी बाहेर निघत आहे.म्हणून परिसरातील लोकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.तसेच युवा मंचच्या वतीने व ग्रामस्थांच्या वतीने धरण दुरुस्ती व पाठ चारी दुरुस्तीची ही मागणी केली असून तापी नदीचे पाणी धरणात सोडल्याने परिसर सुजलाम सुफलाम होईल अशी मागणी केली.

यावेळी डॉ. विजयकुमार गावित म्हणाले की,गेल्या अनेक वर्षापासून सिंचनाला विशेष प्राधान्य राहिले आहे.सिंचनासाठी मतदारसंघातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात गुजरात पॅटर्न राबवून जिल्ह्याच्या प्रत्येक शेतकर्‍यांना बांधावर पाणी कसे पोहोचेल असे नियोजन असुन शेतकरी सुखी समाधानी कसा होईल हाच माझ्या निर्धार असल्याचे सांगितले. शासनाच्या विविध योजना मतदार संघातील प्रत्येक गावातील तळागळातील व सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचले आहेत अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांची घरांचे शेतीचे नुकसान झाले त्यांना पंचनामे पूर्ण झाल्यावर नुकसानभरपाई त्वरित मिळवून देऊ व जिल्ह्यातील पाजर तलाव धरण फुटलेले असतील किंवा लिकेज असतील त्यांच्या सर्वेक्षण संबंधित विभागाला निधी उपलब्ध करून देऊन दुरुस्तीचे काम शासन स्थरावर त्वरित केले जाईल जिल्ह्यात शंभर टक्के बागायत शेती हाच उद्देश आहे यासाठी शासन स्थरावर निधीची कमतरता पडू देणार नाही असे आश्वासन डॉ. गावित यांनी दिली.तसेच महात्मा फुले युवा मंच चांगले उपक्रम राबवत असल्याचे सांगितले.

डॉ. विजयकुमार गावीत यांच्या हस्ते लोंढेरे ग्रामपंचायतीचे सरपंच दिनेश मालचे,दिनेश मालचे,उपसरपंच प्रतिनिधी हिम्मतराव रोकडे,जयनगर चे सरपंच मिनाबाई, उपसरपंच सुनील माळी तसेच कोंडावळ,कुकावल,कोठली,कहाटूळ,सोनवद,निंभोरा,धांद्रे खुर्द व उभादगड,माटकुट, बोराळा ,कळंबु, कवठळ आदींसह परिसरातील गावांतील सरपंच उपसरपंच यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी रवींद्र जाधव, महेंद्र रोकडे, मनोहर रोकडे, मनोज रोकडे, दादा पंडित माळी, घनश्याम माळी,देविदास जाधव,चंद्रसिंग मालचे, युवा मंच प्रदेश सदस्य राजेंद्र माळी,यशवंत रोकडे,कृष्णा वारुळे,अमृता रोकडे, मधुकर माळी आदींनी परिश्रम घेतले तर युवा मंचचे राकेश माळी यांनी आभार मानले.आय.डी.माळी यांनी सूत्रसंचालन केले

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!