Type to search

नंदुरबार

गणेश मुर्त्यांचे काम अंतीम टप्प्यात, मुर्त्यांवर अखेरचा हात फिरवण्याचे काम सुरु

Share

शहादा | ता.प्र.- येत्या २ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरूवात होणार आहे. त्यामुळे येथील मुर्ती कारखान्यांमध्ये तयार करण्यात आलेल्या शेकडो लहान मोठ्या मुर्त्यांवर अखेरचा हात फिरवण्याचे काम सुरू आहे. शहादा तालुक्यातील गणेशमूर्ती तयार करण्यासाठी कुंभारवाड्यात लगबग सुरू आहे.
ग्रामीण भागात गणेशोत्सवानिमित्त घरगुती गणेशमूर्ती बनवणे, रंगकाम करणे आदी कामावर कुंभार मूर्तिकार त्यांच्या कुटुंबियांसह मग्न झाले आहेत. सार्वजनिक नोंदणीकृत तरुण मंडळाच्या गणेशमूर्तींची जवळपास८० टक्के कामे कारागिरांनी पूर्ण केली आहेत. त्याचदरम्यान गौरीशंकर यांचे मुखवटे बनविण्याच्या कामाला गती येऊ लागली आहे. कुंभारवाड्यातील मूर्ती बनवण्याची कामे रात्रंदिवस सुरू आहेत. शाडूच्या मूर्तींना ग्रामीण भागात नव्या बदलत्या काळात गणेशभक्तांकडून मागणी आहे.

शहादा परिसरातील दर्जेदार कलात्मक गणेशमूर्तीनिर्मितीचे काम श्री मोरीया आर्टस्च्या माध्यमातून सुरू आहे.

आर्टस्चे मालक दीपक कुंभार यांनी सांगितले, पश्चिम परिसरात अनेक मूर्तिकार कुंभारबांधव असून, सर्वच दर्जेदार मूर्ती बनवतात. मोरीया आर्टस्तर्फे सजावट केलेल्या मूर्ती, मुख्यवट्यांना मोठी मागणी आहे. सजावट केलेले ३५ तरुण मंडळांच्या व लहान ४०० गणेशमूर्ती व गौरीचे मुखवटे दरवर्षी मागणीनुसार दिल्या जातात.

गेल्या काही वर्षापासून मोरीया आर्टस्चा कारभार वाढला आहे. वर्षाला ४०० ते ५०० गणेशमूर्तींची सजावट व रंगकाम या ठिकाणी केले जाते. हा व्यवसाय सहा महिने सुरू असतो. मूर्ती सजावटीमध्ये कुटुंबातील सर्वच व बाहेरील सहा कामगार पूर्णवेळ काम करतात. स्वत: डिझाईन व सजावट काम पाहणे व सर्वांना कामे वाटून दिली जातात. तसेच त्यावर झालेली मूर्ती सजावटी स्वत: पाहूनच नंतर विक्रीसाठी उपलब्ध करून दिली जाते. इतर महत्त्वाच्या जबाबदार्‍या कुटुंबातील मंडळी पार पडतात. तर काही मंडळीही विक्रीचे नियोजन करतात असे सांगण्यात आले.

सध्या विविध प्रकारचे साहित्य वापरून मूर्तीची सजावट केली जाते. मूर्ती जितकी मोठी त्यावर जेवढी सजावट केली असेल त्याप्रमाणे दर ठरतो. साधारण ४०० रुपयापासून मूर्तीच्या किमती सुरू होतात, मोठी मूर्ती किमान पंचवीस हजारापर्यंत विकली जाते,यावर्षी कच्या मालाच्या किमती वाढल्या असल्याने मुर्तीच्या किमतीतसुद्धा वाढ करावी लागली. यंदा पीक पाणी चांगले होते. परंतु अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने आणि संततधार पावसामुळे यंदा मुर्ती उद्योगावर परीणाम झाला. परीणामी यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत ६० ते ७० टक्केच मागणी असल्याचे असे दीपक यांनी सांगितले. याशिवाय इतरही मुर्तीचे वेगळया पद्धतीने डिझाईन केले जाते. यंदाच्या गणेशोत्सवात गणेशमूर्तीच्या किमतीत थोडी वाढ होणार असल्याचे ग्रामीण मूर्तिकारांनी यावेळी सांगितले. तसेच इको फ्रेंडली कलर वापरण्याकडेही अनेकांचा कल आहे. दगडुशेठ, लालबागचा राजा, बालहनुमान शिवबा, श्रीराम, जय मल्हार यासंह अनेक देवदेवतांच्या अवतारात मुर्ती साकारण्यात आल्या आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!