Type to search

तळोद्यात ग्रामसेवकांनी बीडीओंकडे केले शिक्के जमा

Share

आमलाड | वार्ताहर – महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बेमुदत कामबंद आंदोलनात तळोदा शाखेने सहभाग घेतला आहे. गुरुवारी तालुक्यातील सर्व ग्रामसेवकांनी आंदोलनातील सहभाग म्हणून गटविकास अधिकार्‍याकडे ग्रामपंचायतीचे शिक्के जमा केलेत.

आंदोलनात ग्रामसेवक युनियन चे तालुका अध्यक्ष किसन पावरा, उपाध्यक्ष रामकृष्ण बोरसे, सचिव मुकेश कापुरे, यजुर्वेंद्र सूर्यवंशी, शांतीलाल बावा, निशा पाडवी, संगीता पाटील, कौशल्या पाडवी, शितल तडवी, कल्पना राठोड, राकेश पावरा, मिलिंद पाडवी, भिला भलकार, अरुण वरसाळे आदींसह तालुक्यातील सर्व ग्रामसेवक उपस्थित होते.

ग्रामसेवक युनियनतर्फे पुकारण्यात आलेल्या बेमुदत कामबंद आंदोलनात गटविकास अधिकारी सावित्री खर्डे यांच्याकडे ग्रामपंचायतीचे शिक्के जमा करण्यात आले.

दरम्यान, शासनाने आमच्या न्याय मागण्यांकडे वारंवार दुर्लक्ष केल्याने आम्हाला हे आंदोलन करावे लागत आहे. नागरिकांना त्रास देण्याचा आमचा हेतू नसून आमच्या न्याय मागण्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन आहे, असे तळोदा तालुकाध्यक्ष किसन पावरा यांनी सांगितले.

Leave a Comment

error: Content is protected !!