Type to search

Breaking News नंदुरबार मुख्य बातम्या

नंदुरबारात वसुमना पंत तर तळोद्यात अविशांत पांडा नवे प्रकल्प अधिकारी

Share

नंदुरबार| नंदुरबार येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी म्हणुन वसुमना पंत तर तळोदा प्रकल्पाधिकारी म्हणुन अविशांत पांडा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नंदुरबार येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या सहाय्यक जिल्हाधिकारी व प्रकल्प अधिकारी वान्मती सी यांची धुळे येथे जि.प.च्या मुख्यकार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती झाल्याने त्यांचा अतिरीक्त भार तळोदा प्रकल्पाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे देण्यात आला होता.नंदुरबार प्रकल्पाधिकारी पदावर मिताली शेठी यांची नियुक्ती करण्यात आली होत. मात्र त्या रूजु होण्याअगोदर त्यांची बदली झाली असुन नंदुरबारच्या प्रकल्पाधिकारी पदी वसुमना पंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर तळोदा प्रकल्पाधिकारी जितेंद्र डुडी यांची घोडेगाव ता.पुणे येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या सहाय्यक जिल्हाधिकारी व प्रकल्प अधिकारीपदी बदली करण्यात आली.त्यांच्या जागेवर अविशांत पांडा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!