Type to search

नंदुरबार

अक्कलकुवा येथे अडीच लाखाचा मद्यसाठा जप्त

Share

शहादा | ता.प्र. – राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत परराज्यातील विविध ब्रँडचा सुमारे २ लाख ५७ हजाराचा विदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. मात्र, आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला आहे.

आज दि.२१ ऑगस्ट रोजी नाशिक विभागीय उपायुक्त अर्जुन ओहोळ, अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क युुुुवराज राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अक्कलकुवा येथील तीन खुन्या (मोरखी) येथे अवैध मद्यविक्री करणार्‍यांवर दि.२० ऑॅॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजता छापा टाकण्यात आला. सदर गुन्हयातील आरोपी राजेंद्र मधुकर वसावे हा फरार आहे. त्याच्यावर मुंबई दारुबंदी कायदा १९४९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाईत परराज्यातील विदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे.

त्यात झिंगारो २२ बॉक्स (२६४ बाटल्या), किंगफिशर ८ बॉक्स (१९२ बाटल्या), बावा व्हिस्की २ बॉक्स (१०० बाटल्या), बॉम्बे व्हिस्की २२ बॉक्स (११०० बाटल्या), रॉयल बॉम्बे ५ बॉक्स (२५० बाटल्या) व मिनिस्टर रिजर्व २ बॉक्स (२४ बाटल्या) असा एकुण २ लाख ५७ हजार २८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कार्यवाही भरारी पथकाचे निरीक्षक मनोज संबोधी, निरीक्षक अनुपकुमार देशमाने, दुय्यम निरीक्षक जगदीश भांबोरे, जवान हंसराज चौधरी, अजय रायते, हेमंत पाटील, हर्षल नांद्रे, संदीप वाघ, अविनाश पाटील, कपिल ठाकुर, मानसिंग पाडवी यांनी केली. पुढील तपास मनोज संबोधी, अनुपकुमार देशमाने करीत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!