Type to search

नंदुरबार

जिल्हाधिकार्‍यांकडून मतदान यंत्रांची पाहणी

Share

नंदुरबार | आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०१९ साठी मतदान यंत्रांच्या प्रथमस्तरीय तपासणीचे काम महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ परिसरात सुरू करण्यात आले असून जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी येथे भेट देऊन प्रक्रीयेची पाहणी केली.

उत्तर प्रदेशच्या सितापूर येथून ५१० कंन्ट्रोल युनिट, ९०० बॅलेट युनिट व ५५० व्हीव्हीपॅट यंत्र तर हरदोई येथून १ हजार कंन्ट्रोल युनिट आणि १ हजार १०० व्हीव्हीपॅट यंत्र प्राप्त झाले आहेत. तर लोकसभा निवडणुकीतील राखीव असलेले ३४६ कन्ट्रोल युनिट, १६७९ बॅलेट युनिट आणि ३५९ व्हीव्हीपॅट प्रथमस्तरीय तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.

सर्व यंत्रांची तपासणी पुर्ण झाल्यानंतर सरमिसळ करून विधानसभा मतदारसंघात त्यांचे वितरण करण्यात येणार आहे. त्यानंतर परत एकदा सरमिसळ प्रक्रीय करून मतदान केंद्रांना यंत्र वितरीत करण्यात येतील. निवडणुका पारदर्शक पद्धतीने व्हाव्यात यासाठी प्रशासनाने आवश्यक प्रक्रीया सुरू केली असून राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनीदेखील प्रथमस्तरीय तपासणी प्रक्रीया कामाची पाहणी करण्यासाठी कामाच्या ठिकाणी भेट द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकर्‍यांनी केले आहे.

मतदारांच्या सोयीसाठी जिल्हा संपर्क केंद्र
दरम्यान, आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०१९ प्रक्रीयेत नागरिक व मतदारांच्या सोयीसाठी जिल्हा संपर्क केंद्राची स्थापना करण्यात आली असून त्याठिकाणी १९५० हा टोल फ्री क्रमांक कार्यान्वीत करण्यात आला आहे.

मतदार यादीतील शंकांचे निरसन, मतदार यादीतील नाव व तपशीलाची दुरुस्ती, निवडणुक प्रणालीची माहिती देणे, मतदार यादीत नाव समाविष्ट करणे याबाबत संपर्क केंद्रावर माहिती घेता येईल. त्यासाठी या हेल्पलाईन क्रमांकासाठी स्वतंत्र कर्मचारी नेमण्यात आले आहेत. नागरिकांना कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत १९५० क्रमांकावर विधानसभा निवडणुक विषयक माहिती घेता येईल. लँडलाईन व मोबाईल अशा दोन्हीवरून ही सुविधा उपलब्ध असेल. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी केले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!