Type to search

नंदुरबार

छायाचित्रकारांनी कलात्मक फोटोग्राफीसाठी दृष्टिकोन बदलावा- प्रा.डॉ.कदम

Share

नंदुरबार | भूतकाळातील स्मृती जिवंत ठेवण्याचे काम छायाचित्रकार बांधव करीत असतात अश्मयुगापासून फोटोग्राफी सुरुवात झाली आहे.आज मोबाईल सेल्फी पर्यंत फोटोग्राफी येऊन ठेपली आहे. छायाचित्रकारांनी कलात्मक फोटोग्राफी साठी दृष्टिकोन बदलावा असे प्रतिपादन प्रा डॉ माधव कदम यांनी केले

जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त जिल्हा व्यावसायिक छायाचित्रकार संघटना व प्रेस फोटोग्राफर संघटनेतर्फे दंडपाणेश्वर मंदिर आवारात कॅमेरा पूजन वृक्ष वाटप कार्यक्रम घेण्यात आला.कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून प्रा डॉ माधव कदम हे होते.कार्यक्रमाच्या शुभारंभ कॅमेरा पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आले.कार्यक्रमाला व्यवसायिक छायाचित्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप महाजन ,प्रेस फोटोग्राफर संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीन पाटील उपाध्यक्ष अविनाश चौधरी,सल्लागार राकेश तांबोळी, खजिनदार गणेश चौधरी, सचिव सागर बारी,प्रेस फोटोग्राफर संघटनेचे सचिव सूर्यकांत खैरनार, कोषाध्यक्ष सुनिल कुलकर्णी,वैभव थोरात शांताराम पाटील अजय बडगुजर विनोद माळी महादू हिरणवाळे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी ते बोलत होते प्रा कदम हे बोलत होते ते पुढे म्हणाले की कवी कलावंत व साहित्यिक जो संदेश देता तो संदेश छायाचित्रकार बांधव एका क्लिक द्वारे देऊ शकतात फोटोग्राफीसाठी दृष्टी महत्त्वाची आहे जशी दृष्टी तशी सृष्टी तसेच फोटोग्राफी तून सामाजिक सांस्कृतिक परिस्थितीचे दर्शन घडत असते. फोटोग्राफी शास्त्र आहे.मात्र त्याला कला म्हणून बघितले जाते भूतकाळ सांगण्याचे किंवा दाखविण्याचे काम छायाचित्रकार बांधव करीत असतात असे त्यांनी सांगितले यावेळी संदीप महाजन यांनी प्रास्ताविक केले.यावेळी नितीन पाटील म्हणाले की १८३९ फोटोग्राफीला सुरुवात झाली.

एकशे ऐंशी वर्षाच्या फोटोग्राफीचा प्रवासात बदलत्या तंत्रज्ञानाचा प्रमाणे छायाचित्रकार बांधवांनी बदल घडविणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले यावेळी छायाचित्रकार बंधूंना वृक्ष वाटप करण्यात आले.यासाठी सामाजिक वनीकरण विभागाचे सहकार्य लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूषण पाठक पाहुण्यांचा परिचय महादू हिरणवाळे यांनी तर नंदू खैरनार यांनी आभार मानले कार्यक्रमाला छायाचित्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!