Type to search

Breaking News नंदुरबार

नंदुरबार तालुक्यात वीज पडून एकाचा मृत्यू

Share

आठवड्याच्या विश्रांतीनंतर पुन्हा मुसळधार पाऊस

नंदुरबार| प्रतिनिधी

नंदुरबार शहरासह जिल्ह्यात आज पुन्हा दुपारी विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस झाला. तालुक्यातील आडची येथे वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

नंदुरबार शहरासह तालुक्यात आठवडाभराच्या विश्रांतीनंतर आज पुन्हा विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे वातावरणात गारठा निर्माण झाला आहे.

दरम्यान आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास नंदुरबार तालुक्यातील आडची येथील शेतकरी वसंत बुला पाटील (वय 45) हा शेतकरी दुपारी शेतात गेला असताना अचानक वीज कोसळल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांना नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र त्याचा मृत्यू झाला. त्यांच्यावर सायंकाळी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरू होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!