Type to search

नंदुरबार

महाराष्ट्र अंनिसचे जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे

Share

नंदुरबार –

डॉ.नरेंद्र दाभोळकरांच्या खुनाला आज दि.२० ऑगस्ट रोजी ६ वर्षे पूर्ण होत आहेत. अजूनही तपासात गती नाही. मारेकरी पकडण्यात जरी तपासयंत्रनेस यश आले तरी मारेकरी तयार करणार्‍या, देशविघातक संस्थापर्यंत त्यांच्या संस्थाप्रमुखा पर्यंत अजून तपास यंत्रणा पोहचल्या नाहीत.त्यांच्या निषेध व्यक्त करण्यासाठी आज महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
या प्रसंगी निवासी जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आले.

२० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यात सकाळी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर डॉ.नरेंद्र दाभोळकरांचा गोळ्या झाडून निर्घृण खून करण्यात आला. या खुनाची चौकशी करावी अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने करण्यात आली .

या प्रसंगी जेष्ठ विचारवंत प्रा.पितांबर सरोदे, बारकू पाटील, अंनिसचे जिल्हाउपाध्यक्ष डॉ.डी.बी.शेंडे, राज्य सरचिटणीस विनायक सावळे, जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र पाटील, जिल्हा प्रधानसचिव किर्तीवर्धन तायडे, नंदुरबार शाखा उपाध्यक्ष शांतीलाल शिंदे , सुकलाल शिंदे ,शहादा शाखा कार्याध्यक्ष संतोष महाजन , प्रधान सचिव आरिफ मणियार, नंदुरबार शाखा कार्याध्यक्ष सूर्यकांत आगळे , फिरोज खान मोहम्मद खान, कोरो संस्थेचे राजेश जाधव, दिलीप बैसाणे, राजेंद्र मोरे, प्रदीप केदारे, जितेंद्र गव्हाणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!