Type to search

नंदुरबार

नंदुरबारात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयाचा शुभारंभ

Share

नंदुरबार | प्रतिनिधी

नंदुरबार येथे अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त कार्यालयाचा आज शुभारंभ करण्यात आला. नंदुरबार जिल्हा निर्मितीच्या २१ वर्षानंतर हे कार्यालय कार्यान्वित झाले आहे.

धुळे जिल्हयाचे विभाजन होवून नंदुरबार हा स्वतंत्र जिल्हा दि. १ जुलै १९९८ रोजी अस्तित्वात आला. या २१ वर्षाच्या कालावधीत अनेक जिल्हास्तरीय कार्यालय नंदुरबारात सुरु झाली आहेत. परंतू अन्न व औषध प्रशासन विभाग या महत्वाच्या कार्यालयाचे कामकाज गेल्या २१ वर्षापासून धुळे येथूनच सुरु होते. मात्र, आज दि. २ ऑगस्ट रोजी नंदुरबार जिल्हयाच्या स्वतंत्र कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी नाशिक विभागाचे सहआयुक्त सी.डी.साळुंके, धुळे सहाय्यक आयुक्त एल.ए.दराडे, नाशिक सहाय्यक आयुक्त भुषण मोरे, अन्न व औषध प्रशासन विभागाचे निरीक्षक दिनेश तांबोळी, केमिस्ट असोसिएशनचे सुनील चौधरी, किराणा संघाचे महेंद्र जैन आदी उपस्थित होते.

Leave a Comment

error: Content is protected !!