Type to search

ईसाईनगर येथे उन्हाळी शिबिरातंर्गत योगा प्रकारांचे प्रशिक्षण

maharashtra नंदुरबार

ईसाईनगर येथे उन्हाळी शिबिरातंर्गत योगा प्रकारांचे प्रशिक्षण

Share
नंदुरबार । तालुक्यातील धानोरा, ईसाईनगर येथील एस.ए.मिशन इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये उन्हाळी शिबीरातंर्गत विविध योगा प्रकारांचे प्रशिक्षण देण्यात आले होते.

एस.ए.मिशन हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज कराटे असोसिएशनतर्फे या उन्हाळी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यात प्रशिक्षणार्थी वज्रासन, चक्रासन, अनुलोमविलोम, कपालभारती यासोबत मनोरंजन खेळ बॉलिवुड, वेस्टर्न डान्स स्टाईल आदींचे प्रशिक्षण देण्यात आले तसेच कराटे स्पर्धेबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांकडून योगाचे प्रात्यक्षिके करवून घेण्यात आले.

यावेळी मोठया संख्येने प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. यात बेसिक पंच व किकचे प्रकार शिकवण्याचा आले. यात सिंगल पंच, डबल पंच ट्रिबल पंच, स्टे्रट किक, स्टमल किक, स्नॅप की, राऊंड किं आदींची माहिती देण्यात आली. या प्रशिक्षण शिबीरात 50 हून अधिक प्रशिक्षणार्थीनी सहभाग घेतला. उन्हाळी प्रशिक्षण शिउबीरामध्ये सहभागी झालेल्या सर्व प्रशिक्षणार्थीना एस.ए.मिशन ट्रस्टचे चेअरमन आर.के.वळवी, कार्यकारी संचालक राजेश वळवी, एस.ए.मिशन हायस्कुलच्या मुख्याध्यापिका नुतनवर्षा वळवी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शोभना डामरे, एल्जुड एलिश, प्रती खंडेलवाल, क्रिष्णा बोरसे आदींनी सहकार्य केले.

प्रशिक्षणार्थीना ऑलन नंदुरबार जिल्हा कराटे असोसिशनचे अध्यक्ष संतोष मराठे, सचिव गणेश मराठे, आदींचे मार्गदर्शन लाभले. यावेळी मोठया संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!