Type to search

maharashtra नंदुरबार

मतदानासाठी सुटी अथवा दोन तासांची सवलत

Share
नंदुरबार । लोकसभा सार्वत्रिक निवडणूकांसाठी नंदुरबार लोकसभा मतदारसंघ क्षेत्रातील मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी पगारी सुट्टी अथवा दोन तासांची सवलत देण्याचे उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या परित्रकाद्वारे निर्देशित करण्यात आले आहे.

भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकचा कार्यक्रम जाहीर केला असून त्यानुसार नंदुरबार लोकसभा मतदार संघासाठी सोमवार 29 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

या दिवसासाठी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणार्‍या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींना हा आदेश लागू राहील. खाजगी कंपन्या यामधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्यगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर मॉल्स, रिटेलर्स आदी आस्थापनांमध्ये कार्यरत असलेले कामगार ज्या ठिकाणी त्यांचे मतदान आहे. त्याठिकाणातील स्थानिक असल्यास मतदानासाठी दोन तासांची सवलत देणे आवश्यक आहे.स्थानिक नसल्यास कामगारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर करणे आवश्यक आहे. अशा खाजगी आस्थापनेवर कार्यरत कामगारास लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 चे कलम 135बी (2) च्या तरतुदीनुसार त्या दिवसाकरीता मोबदला, मजुरी पासून वंचित राहू नये म्हणून कामाचे दिवसाप्रमाणे सदर दिवसाचा मोबदला अदा करावा.

आयोगाचे निर्देशाची अंमलबजावणी करण्यास कसूर करणार्‍या आस्थापनेचे मालक, आस्थापना लोकप्रतिनिधीत्व अधिनियम कलमच्या तरतूदीनुसार कारवाईस पात्र राहतील. ज्या मतदारांच्या गैरहजेरीमुळे खाजगी व्यवसाय किंवा उद्योगास न भरून निघणारे नुकसान होईल त्यास वरील तरतूदी लागू होणार नाहीत,असे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी, बालाजी मंजुळे यांनी आवाहन केले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!