Type to search

नंदुरबार

सोशल मिडीयाच्या माध्यमातून महिलांसाठी राबविले जातात उपक्रम

Share

शहादा । ता.प्र. – अलिकडे सोशल मिडीयाचा अतिरेक व गैरवापर अधिकच होतांना दिसतोय. पण शहाद्याच्या समाजसेविका सौ. संगिता एच.पाटील या चालवित असलेल्या हॅपी या व्हॉटस् अ‍ॅप गृपच्या माध्यमातून विविध सहली तथा सामाजिक प्रश्नांवर चर्चा घडवून आणत असतात. या गृपच्या सदस्यांमध्ये विविध जाती धर्माच्या, राज्यांच्या तथा परदेशस्थ भारतीय भगिनीदेखील आहेत. त्यामुळे सामाजिक व राष्ट्रिय समरसता ही साधली जाते.

मनोरंजन व पर्यटनातुन प्रेरणा, अनुभवांचा विस्तार, स्वयंपुर्णतेचा आत्मविश्वास, श्रमप्रतिष्ठेचे महत्वं, उद्योजिका होण्यासाठीच्या स्वप्नांना आकाश व राष्ट्राच्या शक्ती स्थळांचा परिचय अशाप्रकारचे कार्याचे उद्दिष्ट डोळयासमोर ठेवून घर संसारात गुंतलेल्या अथवा अर्थाजनाची आवश्यकता असलेल्या भगिनींना सोबत घेऊन पर्यटनातून उद्बोधनाचे काम संगिताताई पाटील या करित आहेत.

यासाठी सोशल मिडीयाचा यथायोग्य वापर करुन महिलांना एकत्र करुन हॅपी गृपच्या नावाप्रमाणेच सर्वांना आनंद देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. त्या विविध सामाजिक संघटनांमध्ये सक्रिय आहेत. अशाच प्रकारची अनुभवपुरक सहल नुकतीच बहादरपूर ता.पारोळा येथे पद्मश्री निलीमा मिश्रा यांच्या बचत गटांचे कार्याचे अवलोकन करण्यासाठी संपन्न झाली. शहादा, शिरपूर, दोंडाईचा, जळगांव, भुसावळ आदी ठिकाणच्या एकुण 55 महिला सहभागी झाल्या.

बचत गटांत काम करणार्‍या महिलांचे अनुभव कथन ऐकुन सर्व महिला भारावल्या. त्या गावात अवर्षणग्रस्त परिस्थिती असून रोजगार नसतांना या महिलांचे कुटुंबाचा उदरनिर्वाह या रोजगारावर सुरु आहे. दिल्ली, बिहार व इतर राज्यात मार्केटींग करणार्‍या या अशिक्षीत व खेडूत महिलांची पोटासाठीची भरारी बघुन निलिमाताइर्ंचे यांच्या उद्धारातले योगदान अनुभवले. महिलांच्या संघटन शक्ती बद्दल नीलिमाताईंंनी संगिता पाटील यांचे कौतुक केले. नंतर जळगांव येथील जैन हिल्स वरील गांधीतिर्थास भेट देवुन स्वातंत्र संग्रामातील स्मृतींना उजाळा दिला. सहलीच्या नियोजनात महानंदा पाटील (भुसावळ), ज्योती पाटील, रोहिनी बडगुजर (शिरपूर), रोहिणी लिभांरे (दोंडाईचा) यांचे सहकार्य लाभले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!