Type to search

नंदुरबार

शिक्षकेतर कर्मचार्‍यांमधूनही आमदार निवडला जावा

Share

नंदुरबार । गाव पाड्यांचा विकास करण्यासाठी सरपंच, शहराचा विकास करण्यासाठी प्रभागांमधून नगरसेवक, त्याचप्रमाणे विधानसभा, विधानपरिषदेतून आमदार निवडले जातात. त्याचप्रमाणे शिक्षकेतर कर्मचार्‍यांमधून सुद्धा प्रतिनिधित्व करण्यासाठी संधी मिळावी म्हणून शासन स्तरावरून आमदार निवडला जावा अशी मागणी करण्यात आली आहे. कर्मचार्‍यांच्या समस्या शासनस्तरावरून सोडवण्यासाठी सभेत संघटित होण्याचा निर्धार करण्यात आला.

नंदुरबार जिल्हा माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघातर्फे शहरातील हि.गो श्रॉफ महाविद्यालयाच्या सभागृहात आज सहविचार सभा घेण्यात आली. या सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे माजी अध्यक्ष चंद्रभान राजपूत होते. व्यासपीठावर कर्मचारी संघटनेचे डी.पी महाले, माधव पाटील, प्रकाश जोहरी, दिलीप साळवे उपस्थित होते. मागील सभेचे इतिवृत्त वाचून सभेला सुरुवात करण्यात आली. सहाय्यक धर्मदाय आयुक्त कार्यालयात संस्थेची अधिकृत नोंदणी करणे. वार्षिक सभासद फी ठरवणे त्याचप्रमाणे 25 जुलै रोजी नाशिक विभागीय तक्रार निवारण सभेत जिल्ह्यातील कर्मचार्‍यांच्या समस्या मांडण्याचे ठरवण्यात आले. जिल्ह्यांतर्गत येणार्‍या तालुका कार्यकारीणी निवडण्यासाठी समितीची नेमणूक करण्यात आली. त्या समितीवर चंद्रभान राजपूत यांची निवड करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. याप्रसंगी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डी.पी महाले म्हणाले, शिक्षकेतर कर्मचार्‍यांना संघटनेचा कामांसाठी त्याचप्रमाणे कार्यक्रम राबविण्यासाठी हक्काची जागा उपलब्ध नसल्यामुळे अडचणी निर्माण होत असतात. संघटनेच्यावतीने नगरपालिकेला सभागृह साठी मागणी करण्यात येणार असल्याचे सांगितले.

संघटनेची नुतन कार्यकारणी जाहीर
बैठकीत संघटनेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. अध्यक्षपदी डी.पी महाले, उपाध्यक्षपदी मन्यार जुबेर शेख, एम.के चव्हाण, सुनील वायकर, महेंद्र सुर्यवंशी, माधव पाटील, श्रीमती मीना वसावे, सचिव सय्यद इसरार कमरअली, खजिनदार जयेश वाणी, हिशोब तपासणीस योगेश निकम, सदस्य महेंद्र गाडे, कैलास अहिरे, प्रदीप चव्हाण, हेमंत नरी, हेमकांत ठाकरे, दिलीप साळवे, प्रशांत पवार, प्रकाश जोहरी यांची निवड करण्यात आली आहे.

कर्मचार्‍यांच्या समस्या सोडवण्यासाठी लढा देऊ
शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या अनेक समस्या उभ्या आहेत. पूर्वी विद्यार्थी संख्या व वर्गानुसार लिपिकांची नेमणूक करण्यात येत होती. यात शासनाने मोठ्या प्रमाणावर कर्मचार्‍यांची कपात केली. परंतु, ज्यांना नेमणूक दिली आहे अशा कर्मचार्‍यांची नोंद शालार्थ प्रणालीत नसल्यामुळे वेतनात मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे कर्मचार्‍यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने कर्मचार्‍यांच्या अडी-अडचणी गांभीर्याने घेणे महत्वाचे आहे.
– चंद्रभान राजपूत
नेते, शिक्षकेतर कर्मचारी

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!