Type to search

Breaking News नंदुरबार मुख्य बातम्या

कोथंबिर @ 400 रुपये किलो

Share

मामाचे मोहिदे ता. शहादा। वार्ताहर – पावसाळा ॠतु सुरू होवून एक महिना झाला तरी पावसाचे आगमन दमदाररित्या न झाल्याने त्याचा परिणाम दैनंदिन जीवनावर झाला आहे. कोथींबिरचे भाव प्रति किलो 400 रूपये झाल्याने गृहिणीच्या नेहमी लागणारी कोथींबर जेवणातून हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे.
मृग नक्षत्रास पावसाचे आगमन होते.

पण पावसाळा सुरू झाला तरी पाहिजे त्या प्रमाणात पाऊस झाला नाही. नदी नाले कोरडे असून काही भागात पेरण्या सुध्दा कोळंबल्या आहेत. ज्या शेतकर्‍यांनी खरीपाच्या पेरण्या पूर्ण केल्या. त्यांनासुध्दा वाढीसाठी पावसाची आवश्यकता आहे. पिकाप्रमाणे भाजीपाला वाढीसाठी पाण्याची आवश्यकता आहे. पाण्याअभावी भाजीपालाची आवकसुध्दा कमी झाली. आवक कमी व मागणी जास्त त्यामुळे मालाची भाव वाढ होत आहे. रोजच्या स्वयंपाकात वापरात येणारी कोथंबीरचे भाव आवाक्याबाहेर गेले आहेत.

सर्व पालेभाज्यांच्या भावात वाढ होवून प्रत्येक भाजी 80 ते 100 रूपये प्रतिकिलोने विकली जात आहे. पावसाचे आगमन लवकर झाले नाही तर कोथंबीरसह भाजीपाल्याचे भाव आवाक्याबाहेर जातील रोजच्या जेवणातील भाजीपालासुध्दा नाहीसा झाल्याशिवाय विहिर व बोरविहीर यांच्यासुध्दा पाण्याची पातळी वाढली नाही.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!