Type to search

नंदुरबार

मासिक पाळीच्या व्यवस्थापनाबाबत महिलांमध्ये जाणीवजागृती आवश्यक – विनय गौडा

Share

नंदुरबार । ग्रामीण भागात मासिक पाळी संदर्भात चुकीच्या पद्धतीचा अवलंब केला जातो. यामुळे महिलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. मासिक पाळीच्या काळात महिलांनी योग्य काळजी घेतल्यास कुपोषण, अ‍ॅनेमिया यासारखे जिल्ह्यातल्या समस्यांना आपोआप आळा बसेल यासाठी महिलांमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे.असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी केले.

जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन (ग्रा) अंतर्गत नंदुरबार येथील कन्यादान मंगल कार्यालय येथे आयोजित मासिक पाळी व्यवस्थापन या विषयी दोन दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित प्रशिक्षकांना मार्गदर्शन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा बोलत होते.यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सारीका बारी, नंदुरबार पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अशोक पटाईत, सांगली येथील मुख्य प्रशिक्षक श्रीमती शांता वडेर आदी उपस्थित होते. यावेळी गौडा म्हणाले की, जिल्ह्यात कुपोषण, अ‍ॅनेमिया यांना हद्द पार करायचे असले तर मासीक पाळी काळात महिलांनी योग्य काळजी घेऊन त्याचे व्यवस्थापन करणे महत्वाचे आहे. मासीक पाळी संदर्भात असलेल्या गैरसमजुती व अंधश्रद्धा यांचे उच्चाटन करणे आवश्यक आहे. यासाठी महिला व किशोर वयीन मुली यांच्यात चळवळ निर्माण झाली पाहिजे.

शाश्वत स्वच्छतेच्या अनुषंगाने वैयक्तीक स्वच्छतेचा अविभाज्य भाग म्हणुन मासिक पाळी व्यवस्थापन याबाबत क्षमता बांधणी व जागृती होणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने महिला व मुलींच्या आरोग्य व आत्मसन्मानासाठी मासिक पाळी दरम्यान स्वच्छता व आरोग्य संबंधी बाबी हाताळणे याविषयी ग्रामस्तरावर विविध माध्यमातून महिला व किशोरवयीन मुलींमध्ये क्षमता बांधणी व्हावी यासाठी जिल्हयात मुख्य प्रशिक्षक तयार करण्यासाठी या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्य प्रशिक्षकांसाठी जिल्हास्तरावरील एकात्मिक बाल विकास प्रकल्प, आरोग्य विभाग आणि शिक्षण विभागातील 70 महिलांची मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड करुन त्यांना प्रशिक्षित करण्यात आले.

यावेळी सांगली येथील मुख्य प्रशिक्षक श्रीमती शांता वडेर यांनी उपस्थित महिलांना मासिक पाळी म्हणजे काय मासिक पाळी संदर्भात नर्माण होणारी आव्हाने व उपाय, मासिक पाळी दरम्यान घ्यावयाची काळजी,काळजी न घेतल्याने होणारे आजार,मासिक पाळी व्यवस्थापनाचे फायदे,व्यवस्थापनाच्या पद्धती आदी विषयावर विविध खेळ,गट चर्चा,व्हिडीयो यांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले.यावेळी उपस्थित प्रशिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नोत्तर, शंका निरसनही श्रीमती शांता वडेर यांनी केले.प्रास्ताविक डॉ. सारीका बारी यांनी केले. तर आभार योगेश कोळपकर यांनी मानले. प्रशिक्षण यशस्वीतेसाठी जिल्हा कक्षातील सर्व तज्ञ व सल्लागार यांनी परिश्रम घेतले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!