Type to search

नंदुरबार

मुख्याधिकारी नसल्याने संतप्त तरुणाने केली खुर्च्याची तोडफोड, बांधकाम विभागाला टाळे ठोकले

Share

नंदुरबार | मुख्याधिकारी कार्यालयात हजर नसल्याने तसेच प्रभागात कामे करत असतांना दुजाभाव केला जात असल्याची भावना झाल्याने संतप्त तरुणाने आज मुख्याधिकार्‍यांच्या दालनात जावून खुर्च्यांची तोडफोड केली तसेच बांधकाम विभागातील कर्मचार्‍यांना बाहेर काढून टाळे ठोकले. मात्र, याबाबत शहर पोलीस ठाण्यात कुठलीही नोंद करण्यात आलेली नाही.

याबाबत उपलब्ध माहितीनुसार, येथील मुख्याधिकारी कार्यालयात कधीही राहत नाहीत. त्यामुळे सामान्य नागरिकांचे तसेच पदाधिकार्‍यांच्याही प्रभागातील कामे होत नाहीत. एका प्रभागातील नगरसेविका त्यांच्या प्रभागात कामे व्हावी यासाठी काही दिवसांपासून पालिकेत चकरा मारत होत्या. मात्र, त्यांना पालिकेच्या कर्मचार्‍यांकडून किंवा अधिकार्‍यांकडून समाधानकारक उत्तर मिळत नव्हते. त्यामुळे त्यांनी आपल्या प्रभागातील कामे करण्यास दुजाभाव होत असल्याचा आरोप केला. त्यामुळे संतप्त झालेल्या त्यांच्या पुत्राने मुख्याधिकार्‍यांचे दालन गाठले. मात्र, मुख्याधिकारी पालिकेत हजर नव्हते. त्यामुळे संतप्त होवून त्याने मुख्याधिकार्‍यांच्या दालनातील खुर्च्यांची तोडफोड केली. तसेच बांधकाम विभागातील कर्मचार्‍यांना बाहेर काढून टाळे ठोकले. मात्र, याबाबत पोलीस ठाण्यात कुठलीही नोंद करण्यात आलेली नाही.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!