Type to search

नंदुरबार

रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करणार

Share

शहादा । ता.प्र.- ग्रामीण भागातील जनतेच्या सर्वांगीण विकास महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांच्या सबलीकरण सक्षमीकरण याच्यासह शिक्षण व रोजगाराकरिता आपला प्रयत्न राहणार आहे, असे प्रतिपादन शहादा तळोदा मतदार संघातील भारतीय जनता पक्ष सेना युतीचे उमेदवार राजेश पाडवी यांनी मंदाणा परिसरात प्रचार करतांना केले.

शहादा तालुक्यातील मंदाणा, ओझरटा, नवानगर, भोरटेक, गोगापूर जवखेडा, डोंगरगाव, कवळीथ, सावखेडा, म्हसावद व पिंपरी येथे मतदारांशी संपर्क करत त्यांनी मतदारांना येणार्‍या निवडणुकीनंतर विजयी झाल्यावर आपला पक्ष व आपण काय करणार याबाबत माहिती दिली. यावेळी त्यांच्यासोबत श्री सातपुडा तापी परिसर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, शहादा तालुका खरेदी-विक्री संघाचे माजी चेअरमन विजय विठ्ठल पाटील, माजी नगरसेवक के.डी.पाटील, सुनील चव्हाण, जयप्रकाश पाटील, जयपालसिंह रावल, दिनेश खंडेलवाल, माजी नगराध्यक्ष विजय दामू पाटील, किशोर पाटील यांच्यासह कार्यकर्ते प्रचारात सहभागी झाले होते.

राजेश पाडवी यांनी या भागात मतदारांच्या शेतात, गावात जाऊन भेटीगाठी सुरू केल्या आहेत. यावेळी त्यांनी मतदारांना सांगितले, राज्यात व केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार असताना गेल्या पाच वर्षात विविध विकास कामे झालेले आहेत. ग्रामीण भागातले रस्ते दळणवळण व्यवस्था तसेच खेडे पाडे येथील महिला सबलीकरण सक्षमीकरण करण्यासाठी स्वतःच्या हिमतीवर उभा राहण्याकरिता बचत गट या माध्यमातून लहान-मोठे उद्योग सुरू करण्यासाठी प्रोत्साहन करणार असल्याचे सांगून ग्रामीण भागातील तरुणांना महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा तसेच स्पर्धा परीक्षेकरीता शहादा येथे केंद्र उभारण्याचा संकल्प त्यांनी केला आहे.

तालुक्यात असलेल्या विविध प्रकल्पांच्या माध्यमातून शेतजमिनींना पाणीपुरवठा कसा होईल याकरिता नियोजन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या मार्गदर्शनाखाली या मतदारसंघाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणार आहोत, असेही पाडवी यांनी सांगितले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!